शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

‘भारतमाते’चा पोरखेळ सुरू आहे का?

By admin | Published: April 11, 2016 1:47 AM

‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे.

मुंबई : ‘भारतमाता की जय म्हणा, भारतमाता की जय म्हणा,’ असे सांगितले जात आहे. अरे, हा काय भारतमातेचा पोरखेळ सुरू आहे का? तुम्ही भारतमातेचा पोरखेळ केला आहे. आता तुम्हाला भारतमाता दिसते का? भारतमातेवर आक्रमणे झाली तेव्हा तुम्ही कुठे होता? शुद्र आणि स्त्रियांनी हा देश टिकवला आहे; आणि आता तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवता?, असा हल्लाबोल ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी प्रस्थापितांवर केला.राजकीय व्यक्तींना फसवेगिरी करता येत नाही. फसवेगिरी केली की ‘अच्छे दिन’च्या गोष्टी कराव्या लागतात, अशी खिल्लीही त्यांनी मोदी सरकारचा उल्लेख न करता उडविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ‘आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर रविवारी चर्चासत्र झाले.राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. सुरेश माने यांनी बाबासाहेबांना आपण जाणून घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. आपल्याकडे आंबेडकर मॉडेल स्वीकारणारे लोक खूप आहेत. परंतु ते अंमलात आणणारे लोक कमी आहेत. एकट्या ‘बुद्धीझम’ने आदर्श समाज निर्माण होईल का?, यावर चिंतन आणि मनन होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी २०१६ मध्येही जात टिकून असल्याबाबत खंत व्यक्त केली.एम. एस. बहेल यांनी शिक्षण घेऊन माणूस मोठा होणार नाही, असे सांगत विचार बदलण्याचे आणि कृती करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी तरुणांना वैचारिक वाद घालण्याऐवजी कृतीशील होण्याचे आवाहन केले. आयकर प्राधिकरणाचे आयुक्त सुबचन राम यांनी आदर्शवाद आणि विचार यात फरक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आधी बहुजन समाजाची व्याख्या निश्चित करा, तरच आपण शासन करू. अन्यथा आपण भावनाप्रधान असल्याने आपला ‘जय भीम, जय भीम’ बोलून वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. लंडनमधील उद्योजक एम.एस. बहेल, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)