शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

भार्इंदर निवडणूक तारखा उद्या जाहीर?

By admin | Published: July 14, 2017 3:44 AM

येत्या शनिवारी, १५ जुलैला मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

धीरज परब । लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मतदारयादी तयार करण्याच्या सावळ्यागोंधळामुळे अंतिम यादीची प्रसिध्दी लांबली असताना त्याची वाट न पाहता येत्या शनिवारी, १५ जुलैला मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली, तर आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची चिन्हे आहेत. मात्र प्रचारासाठी जेमतेम २५ दिवस मिळणार असल्याने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रभागनिहाय मतदारयाद्या, मतदान केंदे्र आदी तयारीसाठी २ जूनला राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यक्रम दिला होता. २५ जूनला प्रारुप प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे, १ जुलैपर्यंत हरकती, ७ जुलैला प्रभागनिहाय अंतिम याद्या-मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि ११ जुलैला प्रभागनिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द करणे आवश्यक होते. परंतु मीरा-भार्इंदर व ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्यांनी घातलेला घोळ, पालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्यांमधील सावळ््यागोंधळामुळे हरकतींची तारीख ४ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. पुन्हा पालिकेने मुदतवाढ घेतल्याने आयोगाने ६ जुलैपर्यंत हरकती-सूचना आणि २० जुलैला प्रभागनिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे जाहीर केले. ही अनागोंदी व गैरप्रकार यामुळे संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रकच कोलमडून पडले. पण त्यातील नागरिकांच्या सहभागाचे काम पूर्ण झाल्याने यादी आयोगाकडे पाठवण्याची तांत्रिक बाब पूर्ण होईपर्यंत न थांबता निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेची महापौर निवडणूक २८ आॅगस्टपर्यंत व्हायला हवी. त्यासाठी किमान दहा दिवस अगोदर मतदान व्हायला हवे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आठवडा, त्यांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप आणि अंतिम यादी यासाठी किमान पंधरवडा द्यावा लागतो. नंतर प्रचारासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी आणि मतदान, मोजणी यांचा कालावधी पाहता १५ जुलैला आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी स्पष्ट होणार, त्यात प्रभागाचा आकार दुप्पट झाला आहे. त्यांच्या रचनेत बदल झाल्याने, प्रचाराचे दिवस कमी होण्याच्या शक्यतेने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.>आचारसंहिता लागताच उमेदवारी अर्जआचारसंहिता लागू होताच भाजपातील इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटले जातील असे भाजपाचे निवडणूक प्रभारी खासदार कपील पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हेही प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पाटील यांनी गुरूवारी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इच्छउकांची संख्या खूप असल्याने बंडाळीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्यासाठी मेहनत करा, अशी समज उपस्थितांना दिली. पक्षाने प्रत्येक प्रभागात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी दिली जाईल, असे पाटील म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, गटनेते शरद पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते. >१८ आॅगस्टला मतदान? : १२ व १३ आॅगस्ट रोजी शनिवार-रविवार, तर १५ ला स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. १७ रोजी पारसी नववर्षाची सुट्टी आहे. २५ पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. २८ आॅगस्टला सोमवार येत असल्याने महापौरपदाची निवडणूक त्याचदिवशी किंवा २४ आॅगस्टपर्यंत पार पाडावी लागेल. स्वातंत्र्यदिनाच्या बंदोबस्ताच्या दोन दिवसांच्या काळात मतदान होण्याची शक्यता नाही. त्यामुळे १८ आॅगस्टला मतदान होण्याची दाट शक्यता आहे.