आई-बहिणीवरून शिव्या देत राडेबाजांसारखे तुटून पडले, भास्कर जाधव यांनी सांगितला अध्यक्षांच्या दालनातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:11 PM2021-07-06T12:11:08+5:302021-07-06T12:12:54+5:30

संस्कार, संस्कृती, सभ्यतेला काळे फासले गेले. एवढी लांच्छनास्पद घटना यापूर्वी घडलेली नव्हती.

Bhaskar Jadhav said what happened in the President's Hall | आई-बहिणीवरून शिव्या देत राडेबाजांसारखे तुटून पडले, भास्कर जाधव यांनी सांगितला अध्यक्षांच्या दालनातील प्रकार

आई-बहिणीवरून शिव्या देत राडेबाजांसारखे तुटून पडले, भास्कर जाधव यांनी सांगितला अध्यक्षांच्या दालनातील प्रकार

Next

मुंबई : विरोधी पक्षनेते लालबुंद होऊनच अध्यक्षांच्या दालनात आले. सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही म्हणून ते माझ्यावर रागावलेले होते. मी त्यांच्याशी बोलतच होतो, तेवढ्यात या बाजूचे (भाजप) काही आमदार आत घुसले, त्यांनी मला अश्लील शिवीगाळ केली. राडेबाजांसारखे ते तुटून पडले, अशा शब्दांत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी घटनाक्रम सांगितला. त्यावेळी सत्तापक्षाने ‘शेम शेम’च्या घोषणा दिल्या.

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत काळा दिवस आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारा प्रकार आज घडला. संस्कार, संस्कृती, सभ्यतेला काळे फासले गेले. एवढी लांच्छनास्पद घटना यापूर्वी घडलेली नव्हती. मी कोणालाही शिवी दिली नाही. एक साधा असंसदीय शब्द जरी मी वापरला असेल तर तुम्ही ते सिद्ध करा, सीसीटीव्ही फुटेज तपासा, तसे काही आढळले तर तुम्हाला होईल तीच शिक्षा मी स्वत:साठी घेईन, हे सांगताना भास्कर जाधव भावुक झाले.

जाधव म्हणाले, कोणी मला म्हटले की तुम्ही निघून जा; पण मी एक पाऊलही मागे जाणार नाही, पळून तर जाणारच नाही. मी त्यातला नाही. मात्र, आज तालिका अध्यक्ष या नात्याने माझ्याबाबत जे घडले ते लांच्छनास्पद होते. लोकशाहीच्या मंदिरात गुंडशाही व्हायला लागली तर हे सगळे कुठे जाईल, असेही जाधव म्हणाले.

मी रोखठोक आहे. कधीही खोटे बोललेलो नाही. त्याची किंमतही मी मोजली. व्यक्तिगत कटुता कुणाबद्दल ठेवली नाही. आजही फडणवीस, चंद्रकांत पाटील हे अध्यक्षांच्या दालनात आले तेव्हा मी त्यांना सन्मानाने बसण्यास सांगितले. मात्र, तेवढ्यात काही भाजप आमदार आले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या देणे सुरू केले.
- भास्कर जाधव, तालिका अध्यक्ष

Web Title: Bhaskar Jadhav said what happened in the President's Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.