शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

भटजी न बोलावल्याने वाळीत टाकले!

By admin | Published: March 09, 2015 1:36 AM

वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे

चिपळूण : वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. साबळे कुटुंबाने न्याय मिळण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.दापोली तालुक्यात मुरुड, लोणवडी व चिखलगाव येथे मानपानावरून वाळीत टाकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता चिपळूण तालुक्यातही त्याचे लोण पसरल्याचे उघड झाले आहे. साबळे कुटुंबीयांनी रविवारी पत्रकार बैठक घटनेची माहिती दिली. मनोहर तुकाराम साबळे, चंद्रकांत तुकाराम साबळे हे मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील मूळ रहिवाशी असून, नोकरीनिमित्त ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी आई, काकी, काकू राहतात. ही मंडळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. २६ डिसेंबर २०१३ रोजी तुकाराम साबळे यांचे बारावे होते. त्यासाठी भटजीला न बोलविता आपण बारावे करणार आहोत, अशी कल्पना साबळे बंधूंनी वाडीची बैठक घेऊन दिली होती. परंतु, बाराव्याच्यावेळी वाडीतील काही लोकांनी जर तुम्हाला आमच्या मतांनी चालायचे नसेल, तर वाडीशी तुमचा संबंध राहणार नाही. तुमच्या सुखदु:खात, कोणत्याही कार्यक्रमात मार्गताम्हाणे गोपाळवाडी भाग घेणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर वाडीतील कोणाच्याही घरी साखरपुडा, विवाह, बारसे अथवा कोणताही सुखदु:खाचा प्रसंग असेल, तर आम्हाला कोणी बोलवत नाहीत. त्याप्रमाणे घरामध्ये आजूबाजुला कोणतेही मजुरीचे काम करायचे असेल तर मजुरी करणाऱ्या लोकांनादेखील घरी मजुरीसाठी पाठवत नाहीत, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. आम्हाला पुन्हा समाजात घ्यावे, यासाठी २ डिसेंबरला बैठक होणार होती. मात्र संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने ४ जानेवारीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली. बैठकीत तुम्ही आमच्या मताप्रमाणे वडिलांचे कार्य न केल्याने जर तुम्हाला वाडीत घ्यायचे असेल, तर दंड द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. परंतु, गुन्हा न केल्याने हे मंजूर नाही, असे सांगून बैठक आम्ही सोडली. तेव्हा लोक अंगावर धावून आले, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. साबळे कुटुंबीयांच्या वाळीत प्रकरणाबाबत अंनिसचे निखिल भोसले, मनोहर साबळे आदींनी नाराजी व्यक्त केली.