शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
2
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
3
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
4
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच भारतीय खेळाडूंचा जबरदस्त डान्स!
5
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली अॅम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
6
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
7
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
8
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
9
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
10
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
11
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
12
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
13
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
14
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
15
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
16
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
17
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
18
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
20
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"

भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी

By मनोहर कुंभेजकर | Published: July 02, 2024 6:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या  दि,१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज अनेक उमेदवारांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या  दि,१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज अनेक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत. मात्र शिंदे सेनेतून पाच वेळा वाशीमच्या खासदार राहिलेल्या माजी खासदार भावना गवळी आणि दोन वेळा खासदार राहिलेले रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेत नाराजी पसरली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणूक शिंदे सेनेसाठी कठीण असल्याची चर्चा आहे.

खासदार राहिलेल्यांचे पुनर्वसन विधानपरिषदेवर केले, त्यांना विधानसभेला तिकीट देता आले असते. आम्हाला मतदार संघ नाही. विशेष म्हणजे गवळी आणि तुमाने हे दोघेही विदर्भातले आहे. मात्र आम्ही मुंबईकर असून आम्हाला या निवडणुकीत डावलले, अशी दबक्या आवाजात खदखद शिंदे सेनेच्या इच्छुकांमध्ये असल्याचे समजते.

दक्षिण मुंबईत शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांचा आणि दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांचा पराभव झाल्याने त्यांचे कार्यकर्ते सुस्त झाले आहेत. मग मुंबईत शिंदे सेनेचे नवे नेतृत्व कसे तयार होणार? आगामी विधानसभा निवडणुकांना कसे सामोरे जाणार असा सवाल शिंदे सेनेच्या समर्थकांनी केला.

विधानपरिषेच्या मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक निवडणुकीत मुंबईत महायुतीचा दारुण पराभव झाला. महायुतीत समन्वयाचा अभाव होता. भाजप उमेदवार किरण शेलार यांच्यासाठी महायुतीची संयुक्त बैठक झालीच नाही. महाविकास आघाडीचे अँड.अनिल परब यांच्या समोर तगडा उमेदवार द्यायला हवा होता, शिक्षक मतदार संघात महायुती असतांना शिंदे सेना, व अजित पवार गट यांनी आपले आपले उमेदवार उभे केले. परिणामी महायुतीची ही महत्त्वाची जागा गेली, आणि ८० वर्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार ज.मो.अभ्यंकर निवडून आले, अशी माहिती शिंदे सेनेच्या सूत्रांनी लोकमतला दिली.

शिंदे सेनेतून विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे, माजी आमदार किरण पावसकर, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे, उपनेत्या शीतल म्हात्रे आदी दिग्गज इच्छुक असताना संसदेत खासदारकी करणाऱ्या भावना गवळी आणि माजी खासदार कुपाल तुमाने यांना कोणत्या आधारावर आता विधानपरिषदेचे तिकीट दिले, असा सवाल शिंदे समर्थक विचारत आहेत. गवळी आणि तुमाने यांना खासदारकी नाकारली, मग त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कोणत्या निकषावर दिले अशी खदखद इच्छुकांमध्ये आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBhavna Gavliभावना गवळीKrupal Tumaneकृपाल तुमानेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024