मंगळवेढा : उजनी धरणातून १ लाख ५० क्युसेस व वीर मधून १ लाख क्युसेस असे अडीच लाख क्युसेस चा महाविसर्ग भीमा नदीत सोडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या सात गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी पथके तयार केली आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदीकाठी हाहाकार उडाला, असून भीमेने रौद्ररूप धारण केले आहे. तामदर्डी गावाचा संपर्क तुटला आहे.
नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली असून सोलापूर- मंगळवेढा हा महामार्ग उद्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. भीमा नदीकाठी राहणाºया नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़ तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोर, या सात गावाजवळ पुराचे पाणी पोहचले आहे़ भीमा नदी पात्राबाहेर पडल्याने नदी काठची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे़ पाण्याचा वेग असाच वाढत राहिला तर तामदर्दी गावाचा संपर्क तुटणार आहे़ तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नदीकाठी वस्ती करून राहणाºयांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत़ या मार्गावर राहाटेवडीमार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर, रहाटेवाडी ते बोराळे हा मार्ग बंद होणार आहे.