शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

भीमाशंकरला दिसतोय ‘हरियाल’ तर जुन्नरमध्ये ‘नीलकंठ’

By admin | Published: March 03, 2017 1:04 AM

महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘हरियाल’ या पक्ष्याचे भीमाशंकर परिसरात वास्तव्य दिसू लागले आहे.

कांताराम भवारी, अशोक खरात डिंभे- महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘हरियाल’ या पक्ष्याचे भीमाशंकर परिसरात वास्तव्य दिसू लागले आहे. सध्या पोखरी घाटाच्या पायथ्याशी गोहे पाझर तलावाच्या परिसरात या पक्ष्यांचे थवे मार्च-एप्रिलच्या दरम्यान पाहावयास मिळत आहेत. वडाच्या झाडांची फळे परिपक्व होऊ लागताच या परिसरात ‘हरियाल’ दिसत आहेत. हरियाल पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी परिसरातील त्यांची वसतीस्थाने विकसीत करण्याची गरज भासू लागली आहे. ‘हरियाल’ (हिरवे कबूतर) हा पक्षी राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. ‘ट्रेशन फोनिकोप्टेरा’ असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर या सारख्या झाडांच्या सान्निध्यात या पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे पाहावयास मिळते. हा कबूतर वंशीय पक्षी आहे. हरियाल महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून ओळखला जातो. निळसर कबूतराच्या आकाराचा, मजबूत बांध्याचा हा पक्षी आहे. रंग पिवळा, आॅलिव्ह-हिरवा आणि राखट करडा, खांद्यावर जांभळ्या रंगाचा डाग असतो. याचे पिवळे पोट ही याला ओळखण्याची मुख्य खूण आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे पक्षी अन्न मिळविण्यासाठी बाहेर पडतात. फळांनी लगडलेल्या फांदीवर हा पक्षी अतिशय कुशलपणे फळे तोडताना दिसतो. जरासाही धोका जाणवल्यास जागच्या जागी थिजून थांबतो. झाडात याचा रंग इतका बेमालूमपणे मिसळतो, की तो सहजासहजी दिसत नाही. सध्या भीमाशंकर व परिसरात जंगलातील वडाच्या झाडांना लालबुंद फळे लगडली आहेत. ही फळे परिपक्व झाल्याने या जंगलमेव्याचा आस्वाद लुटण्यासाठी अनेक जातीचे पक्षी या झाडांकडे आकर्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखरी घाटाच्या पायथ्याशी गोहे पाझर तलावाजवळ अनेक वडाची झाडे आहेत.सध्या ही झाडे फळांनी लगडली असून या लगडलेल्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी सध्या हरियालचे वास्तव्य या परिसरात असल्याचे पाहावयास मिळते. घाटातील पहिल्या वळणावरील झाडांवर या पक्ष्यांचे थवे विसावले आहेत. > खोडदनीलकंठ म्हणजेच निळ्या गळ्याचा किंवा शंकर म्हणूनही ओळखला जाणारा हा नीलकंठ नावाचा पक्षी सध्या जुन्नर तालुक्यात विहार करताना दिसतोय. विशेष म्हणजे आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत हा पक्षी भारतात वास्तव्य करतो आणि महाशिवरात्री झाल्यानंतर हा नीलकंठ भारतातून निघून जातो, असे म्हटले जाते. नीलकंठ पक्षाचा छाती आणि गळाही अगदी निळा असल्यामुळे त्याला शंकराच्या नावाने ओळखले जाते. केवळ या पक्षाचे नाव हे नीलकंठ असल्यामुळे संपूर्ण भारत देशात या पक्षाची कोणीही चुकूनही हत्या करत नाही. हा नीलकंठ नॉर्थ युरोशिया व लडाख येथून महाराष्ट्रात येतो. नीलकंठबाबत माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणले, की ‘या पक्ष्याला मराठीत नीलकंठ व शंकर म्हणतात, संस्कृतमध्ये श्याम कलह म्हणतात तर इंग्रजीत ब्ल्यू थ्रोट म्हणतात. नीलकंठ मध्यम आकाराचा व चिमणीएवढा असतो तर मादी फिकट काळ्या रंगाची असते. तो उत्तरेकडून भारतीय उपखंडात हिवाळ्यात येतो.सध्या जुन्नर तालुक्यात हा पक्षी नद्या, नाले, पाण्याजवळची झुडपे, गवताळ प्रदेश या ठिकाणी हा नीलकंठ दिसत आहे. भारतभर मिळालेल्या पाहुणचारामुळे तो आनंदी असतो. मार्च ते जुलैमध्ये त्यांचा विणीचा हंगाम असतो. हिवाळ्यात शांत आणि लाजाळू असणारा हा नीलकंठ विणीच्या हंगामात अत्यंत आक्रमक व सुंदर गाणारा बनतो.’