ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 29 - दापोडा इंडियन कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समधील एका प्रिटिंग प्रेसमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. लिओन लेबल प्रा. लि. मधील गोदामात ही आग लागली आहे. गोदामात प्रिटिंग प्रेसचे काम सुरू असताना केमिकलमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र आगीमागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.
आग विझवण्यासाठी घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीमुळे 2 मजूर गोदामात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra: Fire breaks out in a printing press in Bhiwandi, 8 fire tenders at the spot— ANI (@ANI_news) October 29, 2016
दरम्यान, औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाक्यांच्या स्टॉल्सना भीषण आग लागली होती. या मैदानात असणारे जवळपास 200 फटाक्यांचे स्टॉल्स आगीत जळून खाक झाले आहेत. एकमेकांना लागून फटाक्यांचे स्टॉल्स असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीमध्ये 20 ते 25 दुचाकी आणि अनेक चारचाकी वाहनेदेखील जळून भस्मसात झाली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.