शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

भिवंडी महापालिकेत काँग्रेसने मारली बाजी

By admin | Published: May 27, 2017 2:44 AM

‘भाजपाचा रथ आम्हीच रोखू शकतो. देशांत काँग्रेसच्या विजयाची सुरुवात भिवंडीतून होईल,’ असे सांगत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेला

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ‘भाजपाचा रथ आम्हीच रोखू शकतो. देशांत काँग्रेसच्या विजयाची सुरुवात भिवंडीतून होईल,’ असे सांगत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, भिवंडीकरांनी काँग्रेसच्या पदरात भरभरून दान टाकल्याचे शुक्रवारच्या निकालातून स्पष्ट झाले. ९० पैकी ४७ जागा जिंकत, काँग्रेसने भिवंडीत एकहाती सत्ता संपादन केली. भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता करूनही त्या पक्षाला १९ जागांवर समाधान मानावे लागले.राष्ट्रवादीला शून्य जागा मिळाल्याने, त्या पक्षाच्या घड्याळाची टिकटिक भिवंडीत बंद झाली, तर अवघ्या दोन जागा पदरात पडल्याने, समाजवादी पक्षाच्या सायकलची हवा गेल्याचे चित्र उभे राहिले. मागील वेळेपेक्षा २ टक्के अधिक मतदान झाल्याने वेगवेगळ््या पक्षांनी विजयाचे भरघोस दावे केलेले असताना, ९० जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक ४७ जागा मिळाल्या. भाजपाने गेल्या वेळेपेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळवत १९ जागांवर मजल मारली. शिवसेनेच्या जागा चारने घटल्याने तो पक्ष १२ जागांवर स्थिरावला. भाजपाशी समझोता करून सत्तेत मोठा वाटा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणार्क विकास आघाडीच्या जागाही, मागील वेळेपेक्षादोनने घटून त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली, पण त्यात राष्ट्रवादीला शून्य आणि समाजवादी पक्षाला फक्त दोन जागांवर यश मिळाले. ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाने चार आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या. आतापर्यंतच्या परंपरेला तडा जात मतदार पुन्हा त्रिशंकू कौल देतील आणि अपक्षांची संख्या वाढेल, हे राजकीय पक्षांचे दावेही फोल ठरले. या निवडणुकीत २३ प्रभागातील ९० जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. मागील वेळी दोन वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने, तर या वेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक झाली. दर वेळी निवडणुकीत कारणाने धार्मिक मुद्दे, तेढ उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु यंदा निवडणूक शांततेत पार पडली, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. अल्पसंख्य मतदारांत विश्वास निर्माण करण्यात आलेले यश ही काँग्रेसची बाजू ठरली. त्याच वेळी आधीच्या सत्तेत सहभागी असूनही, फारशी कामे न करणाऱ्या कोणार्क आघाडीसोबत समझोता केल्याचा भाजपाला फटका बसला. पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. संघ परिवाराने तर ‘नोटा’चा पर्याय वापरत असल्याचा इशारा दिला. त्यामुळे भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसला. भिवंडीत मेट्रो आणण्याचे आश्वासन, यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलती यांचाही फायदा भाजपाला मिळाला नाही.