शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
2
"मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
3
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
4
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
5
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
6
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
8
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
9
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
10
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
11
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
12
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
14
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
15
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
16
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
17
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
18
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
19
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
20
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

मंदिर समिती अध्यक्षपदी भोसले

By admin | Published: July 03, 2017 5:07 AM

राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे

यदु जोशी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी  कराडचे भाजपा नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे.  या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३० जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार या बाबत प्रचंड उत्सुकता होती.एमआयटीचे डॉ.विश्वनाथ कराड, अतुल भोसले, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, श्री गहनीनाथ औसेकर महाराज आदी नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसले यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाला विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला गेला. भोसले हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे  दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ.सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. स्वत: अतुल भोसले हे कराडच्या कृष्णा मेडकिल कॉलेजचे संचालक आहेत. राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर भोसले यांच्या रुपाने दुसऱ्या भाजपा नेत्याच्या हातात पंढरपूरच्या समितीचा कारभार देण्यात आला आहे. सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्षपद कोणाला? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र राणे हे भाजपाची सत्ता येऊन पावणेतीन वर्षे झाली तरी मुंबईतील श्री सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. भाजपा सरकारने नवीन समितीच नेमली नाही. राणे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २५ जुलैला संपत आहे. युतीमध्ये ठरल्यानुसार या ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाच्या नावाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पसंती देतात या बाबत उत्सुकता आहे.