डिप्पी वांकाणी, मुंबईमाजी मंत्री छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर व मुलगा पंकज भुजबळ यांच्या विरोधातील खारघर हाउसिंग प्रकल्पाची चौकशी करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी पुरते चक्रावले आहेत. भुजबळ कुटुंबीयांनी कोणत्या खात्यातून किती पैसे स्वत:कडे वळते करून घेतले हे पाहताना त्यांना भ्रमित झाल्यासारखे होत आहे. २९ कोटी रुपयांची रक्कम एकाच दिवसात तीन खात्यांमध्ये फिरली आणि शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झालेल्या दोन खात्यांमध्ये दिवसअखेरीस फक्त काही लाखांची शिल्लक राहिल्याने हा काळ्याचे पांढरे करण्याचा आर्थिक व्यवहार असल्याचा संशय बळावला आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार २३ एप्रिल २०१० रोजीच्या व्यवहारात ब्लू सर्कल इन्फ्राटेककडून २९ कोटी रुपये परवेश कन्स्ट्रक्शनकडे ट्रान्स्फर झाले व तीच रक्कम त्याच दिवशी देविशा इन्फ्र ास्ट्रक्चरकडे पाठविण्यात आली व नंतर परत ब्लू सर्कल इन्फ्राटेककडे पाठविली गेली. परवेश कन्स्ट्रक्शन व देविशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या लेखाबुकात कोट्यवधी रुपयांची रक्कम बनावट कंपनीकडून परवेश कन्स्ट्रक्शन (बनावट कंपनी)च्या खात्यात पडल्याचे दाखविण्यात आले आहे. तेथून हे पैसे भुजबळांच्या खात्यात टाकले जात असत.
भुजबळांची ‘खाते’चलाखी
By admin | Published: June 24, 2015 4:34 AM