शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भुजबळांच्या कंपनीला सहा कोटी रुपये

By admin | Published: April 13, 2016 2:21 AM

घराला रंग देण्याचा खर्च काही हजारांचा असला, तरी सामान्य माणूस स्वस्तात काम करून घेण्यासाठी कंत्राटदाराशी बरीच चर्चा करतो, परंतु के. एस. चमणकर एन्टरप्रायजेसने भुजबळांनी

- डिप्पी वांकाणी,  मुंबईघराला रंग देण्याचा खर्च काही हजारांचा असला, तरी सामान्य माणूस स्वस्तात काम करून घेण्यासाठी कंत्राटदाराशी बरीच चर्चा करतो, परंतु के. एस. चमणकर एन्टरप्रायजेसने भुजबळांनी स्थापन केलेल्या बनावट कंपनीला कोणत्याही वाटाघाटी न करता सहा कोटी रुपये अदा केले. भुजबळांनी ही कंपनी रक्कम घेण्यासाठी स्थापन केली होती आणि चमणकरांनी विकत घेतलेल्या फर्निचरचे हे पैसे दिले, असा हा व्यवहार दाखविण्यात आला होता. अशा प्रकारचा ‘व्यावसायिक व्यवहार’ कधी झाला नव्हता, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आरोपपत्रात म्हटले आहे. चमणकर एन्टरप्रायजेसने फर्निचरमध्ये काहीही बदल केलेला नसताना ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या अंदाजपत्रकाबाबत (इस्टिमेट) वाटाघाटी केल्या नाहीत. गुगलवर सर्च केलेले ‘स्क्रीनशॉट्स’ व्हिजिटिंग कार्ड्स आणि बीटूबी आॅनलाइन पोर्टलचा तपशील आरोपपत्रासोबत जोडण्यात आला आहे. भुजबळांनी हवाला व्यवहारासाठी इदिन फर्निचर ही बनावट कंपनी कशी स्थापन केली, हे सिद्ध करण्यासाठी हा तपशील जोडण्यात आला आहे. इदिन फर्निचरचा पत्ता वांद्र्याच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) कार्यालयातील आठव्या मजल्याचा देण्यात आला होता.एमईटीचा अकाउंटंट संजय जोशी आणि तन्वीर शेखची पत्नी इराम शेख हे एमईटीचे कर्मचारी होते. त्यांना डिसेंबर २००७ ते आॅगस्ट २००८ या कालावधीत ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक दाखविण्यात आले. चमणकर एन्टरप्रायजेसने ६७.७१ लाख रुपये सारस्वत को. आॅपरेटिव्ह बँकेच्या वडाळा शाखेत कंपनीच्या खात्यात भरले. सप्टेंबर २०१० ते मार्च २०१३ या कालावधीत ६,०३,६९,३८० रुपये त्याच खात्यात भरण्यात आले आणि हे पैसे दिल्लीतील महाराष्ट्र सदनला फर्निचरचा पुरवठ्यासाठी असल्याचे दाखविले. ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेली अंदाजपत्रके आणि त्यांना मिळालेले पेमेंट यांच्यात फरक नाही, असे आरोपपत्रात म्हटले आहे.