मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळयातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांची मंगळवारी जे.जे. रुग्णालयात तपासणी करण्यात आली. रुग्णालयातील पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने त्यांची तपासणी केली. या अहवालावर भुजबळ यांच्या जामिनाचे भवितव्य अवलंबून आहे. २७ मे रोजी तपास यंत्रणा सीलबंद अहवाल उच्च न्यायालयापुढे सादर करणार आहेकोट्यवधी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ््याप्रकरणी छगन भुजबळ यांना आॅर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांनी वैद्यकीय कारणावरुन उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांची प्रकृती तपासणीसाठीमेडिकल बोर्ड स्थापन करण्याचा आदेश जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना दिले होते. . त्यानुसार डॉ. लहाने यांनी पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मंगळवारी भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. (प्रतिनिधी)
भुजबळ यांची जेजेत तपासणी
By admin | Published: May 25, 2016 2:07 AM