राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये संदिपान भूमरे, गुलाबराव पाटील यांचंही नाव आहे. दरम्यान, त्यांच्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला.
“सदा सरवणकर यांनी सेनाभवनासमोर एकनाथ शिंदेंविरोधात आवाज काढला. नंतर ते छातीत दुखतंय म्हणून रुग्णालयात गेले आणि मागच्या दारानं पळून गेले. एकटे सरवणकरच नाही. दोन दिवसांपूर्वी प्रमुख मंत्रीही वर्षा बंगल्यावर होते. पुढील रणनितीबाबत चर्चा झाली. पुढच्या दिवशी गुलाबराव पाटील, दादा भूसे तिकडे निघून गेले,” असं राऊत म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
“गुलाबराव पाटील ही शिवसेनेतले सर्वात जुने व्यक्ती. त्यांची भाषण ऐकली तर माझ्यासारखा पानटपरीवाला कसं शिवसेनेनं मोठं केलं हे ते आपणहूनच सांगतात आणि पळून जातात. याला काय म्हणावं?. संदीपान भूमरे सहा वेळा आमदार झाले. त्यांना पहिल्यांदा तिकीट मिळावं म्हणून मी शिवसेना प्रमुखांशी वाद केला. मोरेश्वर साबळेंचं तिकीट कापून यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी ते पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यावर वॉचमन म्हणून म्हणून काम केलं. आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांना काय कमी केलं शिवसेनेनं? हे आज हिंदुत्व सांगतात. त्यांना हिंदुत्व हा शब्द तरी लिहिता येतो का? भूमरेंनी हिंदुत्व बोलून दाखवावं आणि लिहून दाखवावं,” असंही ते म्हणाले.