अहमदनगर : शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याबाबत देवस्थान विश्वस्त व गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी सोमवारी शिंगणापूरमध्ये येणार आहेत. विश्वस्त व ग्रामस्थांना शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याची विनंती बैठकीत करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी महिती अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली़शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडने प्रजासत्ताक दिनी आंदोलन केले होते़ शिंगणापूरकडे निघालेल्या महिला आंदोलकांना पोलिसांनी नगर हद्दीत सुपा येथून अटक केली़त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्यावर एकमत झाले़ बैठकीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविलाआहे़ त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही़ सोमवारच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)त्र्यंबकेश्वरलाही आंदोलनश्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील मंदिर गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही़ ७ मार्चला महाशिवरात्री आहे, तोपर्यंत महिलांच्या प्रवेशाबाबत विश्वस्तांनी निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेतर्फे त्र्यंबकेश्वरला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी दिला़
भूमाता ब्रिगेड आज शनिशिंगणापूरमध्ये
By admin | Published: February 22, 2016 2:10 AM