मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतराराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली. हे कंत्राट फ्रान्सच्या आयजीस कंपनीला देण्यात आले आहे.वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीना, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी स्मारक प्रकल्पाच्या निविदा संबंधीच्या कार्यवाहीची माहिती घेतली. या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम सन २०१८ पर्यंत पूर्ण करायचे असून त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून २० एप्रिल ते ५ मे मे या दरम्यानची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कार्यालयासाठी १.१६ कोटीशिवस्मारकाच्या कार्याला गती यावी यासाठी कफ परेड; मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर तात्पुरते कार्यालय उभारण्यासाठी १ कोटी १६ लाख रुपयांच्या खर्चास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे.
शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन एप्रिलमध्ये
By admin | Published: February 25, 2016 2:50 AM