सुधीर लंके■ अहमदनगरराज्यात भाजपाने जोरदार मुसंडी घेतली असताना भाजपसोबत असलेल्या स्वाभिमानी, रिपाइं (आठवले गट), रासप तसेच शिवसंग्राम या पक्षांना मात्र घाटा झाला आहे. डावे पक्ष व समाजवादी पक्षालाही अवघी एकेक जागा मिळाली. शेकापचा 'खटारा' तीन जागांवरच अडकला तर विनय कोरेंचा 'जनसुराज्य' पक्षही नामशेष झाला. युती फिस्कटल्यानंतर भाजपसोबत जात स्वाभिमानीने १२ जागा लढविल्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. राजू शेट्टी यांचे वर्चस्व असलेल्या कोल्हापूर जिलतही पक्षाचा पराभव झाला. २00९ च्या विधानसभेत या पक्षाला एक जागा मिळाली होती. यावेळी मात्र भोपळाही फुटला नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने दौंड, कळमनुरी, भूम-परांडा, गंगाखेड व मान-खटाव या पाच मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढवली. मात्र यापैकी त्यांना केवळ दौंड मध्ये राहुल कुल यांच्या रुपाने विजय मिळाला. अहमदपूरचे पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे यावेळी तेथून विनायक पाटील हे रासपकडून निवडणूक लढले व विजयी झाले. परंतु भाजपने ही जागा रासपला न सोडल्याने पाटील यांना भाजपच्या विरोधात अपक्ष लढावे लागले. त्यामुळे ही जागा तांत्रिकदृष्ट्या रासपत मोडत नाही. रिपाइंच्या आठवले गटाला भाजपने आठ जागा दिल्या होत्या. मात्र रिपाइंकडे स्वत:चे चिन्हच नसल्याने या मतदारसंघांमध्ये भाजपने स्वत:चे उमेदवारही कमळ चिन्हावर उभे करुन आठवलेंना कात्रजचा घाट दाखविला. त्यामुळे रिपाइंला एकही जागा मिळू शकलेली नाही असे या पक्षाच्या जबाबदार पदाधिकार्यांनी सांगितले. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनाही पराभव स्वीकाराला लागला. त्यामुळे 'रासप'च्या एका जागेचा अपवाद वगळता महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या हाती 'भोपळा' आला आहे. शेतकरी कामगार पक्षाला गतवेळी चार जागा मिळाल्या होत्या. यावेळी सांगोला, अलिबाग व पेण या तीन जागांवर त्यांना विजय मिळाला. सांगोला येथून गणपतराव देशमुख यांनी सलग अकरावा विजय मिळवून इतिहास रचला आहे. समाजवादी पक्षाचे गत विधानसभेत चार सदस्य होते. यावेळी मात्र त्यांना केवळ अबु आझमी यांची एक जागा मिळाली. भारिप बहुजन महासंघाने ८५ जागा लढविल्या. मात्र या पक्षाचे केवळ बाळापूर येथील बळीराम शिरासकर विजयी झाले. डाव्या लोकशाही समितीतील माकपने कळवमधून जिवा पांडू गावित यांना पुन्हा विधानसभेत पाठविले. मात्र डहाणूची जागा त्यांना गमवावी लागली. बहुजन विकास आघाडीला यावेळी एका जागेचा फायदा होऊन त्यांचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर व विलास तरे असे तीन आमदार विधानसभेत पोहोचले. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचीही पुरती वाताहत झाली. कोरे यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. गतवेळी या पक्षाचे दोन आमदार होते. 2014 2009 स्कोअर बोर्ड माकप 01 01 01 00 स्वाभिमानी 01 01 रासप 00 00 रिपाइं 00 00 जनसुराज्य जागा बविआ भारिप 02 01 02 04 03 01 00 03 शेकाप
महायुतीतील घटक पक्षांच्या हाती 'भोपळा'
By admin | Published: October 20, 2014 6:57 AM