डोंबिवली: सायकल मित्र संमेलनासाठी २८ जानेवारीची तारिख निश्चित करण्यात आली असून डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराने ती तारीख दिली आहे. दोन महिन्यांपासून नाट्यगृह मिळत नसल्याने आयोजकांची अडचण झाली होती, त्यामुळे ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस तारिख मिळाल्याने आयोजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.डोंबिवली सायकल क्लब, क्रिडा भारती, नॅशनल यूथ आॅर्गनायझेशान या तीनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारामध्ये त्याच्या ‘लोगो’चे अनावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. या संमेलनाला राज्यासह देशातील सुमारे १ हजार सायकल प्रेमी येणे अपेक्षित असून त्यासाठी डोंबिवली, कल्याण, बदलापूर, आसनाव, वाडा, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, खोपोली, नासिक, कोल्हापूर आदी ठिकाणांसह राज्याच्या विविध भागातून सायकलपटू येतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.२८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत हे संमेलन संपन्न होणार असून त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आॅनलाईन रजीस्ट्रेशन फॉर्मची सुविधा आहे, तसेच क्रिडा भारतीच्या पेंडसेनगर येथिल कानविंदे व्यायाम शाळेतही नोंदणीचे फॉर्म उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. संमेलन यशस्वी होण्यासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित असून त्याचे संकलन सुरु आहे. देशभरातून आलेल्या सायकलपटूंसह सायकल प्रेमींची व्यवस्थेसह संमेलनात विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे.सायकलपटूंसाठी छायाचित्र प्रदर्शन हे विशेष आकर्षण असून त्यासाठीही छायाचित्र संकलनाचे काम जोमाने सुरु आहे. डोंबिवली सायकल क्लबसह शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी त्या कामी आपापले योगदान देत आहे. शहरातील विविध संस्थांमध्ये सामाजिक, आध्यात्मिक, व्यावसायिक संस्थांचा प्रामुख्याने यामध्ये सहभाग होणार असून विविध राजकीय लोकप्रतिनिधींनी त्यास सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी डोंबिवलीकरांवर मोठी जबाबदारी असल्याने सगळयांनी मिळून जबाबदा-या वाटुन घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे डॉ. सुनिल पुणतांबेकर आणि क्रिडा भारतीचे कमलाकर क्षिरसागर यांनी केले आहे. बाहेरगावहून येणा-या सायकलप्रेमींसाठी शहरातच काही नागरिकांच्या घरी निवासाची व्यवस्था करण्याचाही आयोजकांचा मानस आहे, पण सहभागी होणा-यांनी तसे अर्जामध्ये आधीच स्पष्टपणे नमूद करावे असे सांगण्यात आले. आॅनलाईन नोंदणीसाठी facebook.com/cycleDombivli, twitter.com/cycleDombivli या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डोंबिवलीत २८ जानेवारी रोजी सायकल मित्र संमेलन :नाट्यगृहाने अखेर दिली तारिख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 6:41 PM
सायकल मित्र संमेलनासाठी २८ जानेवारीची तारिख निश्चित करण्यात आली असून डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराने ती तारीख दिली आहे. दोन महिन्यांपासून नाट्यगृह मिळत नसल्याने आयोजकांची अडचण झाली होती, त्यामुळे ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस तारिख मिळाल्याने आयोजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ठळक मुद्देसंमेलनात सहभागी होण्याचे केले आवाहन‘लोगो’चे अनावरण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले