जळगाव : नवी मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणात सध्या जळगाव केंद्रबिंदू झालेले आहे. या प्रकरणी अटकेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांचे जळगाव कनेक्शन आहे. एवढेच नव्हे तर तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त राज चाफेकर यांनीही जळगाव जिल्ह्यात काम केले आहे.अभय कुरुंदकर हे १९९१-९२ या कालावधीत जळगावातील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी वरणगाव व तेथून मुक्ताईनगर येथे उपनिरीक्षक म्हणून काम केले. मध्यंतरी त्यांची परिमंडळाच्या बाहेर बदली झाली. त्यानंतर सन २००० वर्षी ते बोदवड येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले.तेव्हा बोदवडला सहायक निरीक्षकच प्रभारी अधिकारी असायचे. येथेच त्यांची राजेश पाटीलशी मैत्री झाली. त्यामुळे ते एकनाथराव खडसे यांच्याही संपर्कात आले होते. त्यादिवसापासून कुरुंदकर व पाटील यांच्यातील मैत्री कायम होती. या गुन्ह्याचे तपासाधिकारी राज चाफेकर यांचाही जळगावशी जवळचा संबंध आहे. त्यांनी जळगाव शहर, पारोळा व जामनेर येथे काम केलेले आहे.मध्यस्थी करणा-या व्यापा-याची चौकशीसांगली : अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरने अश्विनी यांना सांगलीतील यशवंतनगर परिसरात राहण्यासाठी एका माजी नगरसेवकाचा फ्लॅट घेऊन दिला होता. यासाठी कुपवाडच्या एका व्यापाºयाने मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सात ते आठ महिने अश्विनी या फ्लॅटमध्ये राहिल्या होत्या, अशी माहिती पुढे आली.नवी मुंबई पोलिसांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर सांगलीच्या पोलिसांनी या व्यापाºयास चौकशीसाठी ताब्यात घेतले. तब्बल चार तास तो पोलिसांच्या ताब्यात होता. त्याच्याकडून अश्विनी यांना फ्लॅट देण्यापासून ते कुरूंदकरांची ठाण्याला बदली होईपर्यंत काय घडामोडी घडल्या, याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली.राजेश पाटीलचा भाऊ पोलीसराजेश पाटील याचा भाऊ जळगाव जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. कोल्हे नगरात वास्तव्याला असलेल्या भावाकडे राजेश पाटील जळगावात मुक्कामाला थांबला होता. दुसºया दिवशी त्याला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.
बिद्रे प्रकरणात जळगाव केंद्रबिंदू, सांगलीतील व्यापा-याची चौकशी, तपास अधिकारी जळगावचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:03 AM