शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणाऱ्यांना ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 9:23 AM

Two years Of Mahavikas Aghadi: सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणारे विश्लेषक, राजकीय विरोधकांसाठी ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर आहे. वैचारिक भिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि किमान समान कार्यक्रमाच्या झेंड्याखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

बाळासाहेब थोरात  (महसूल मंत्री)सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणारे विश्लेषक, राजकीय विरोधकांसाठी ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर आहे. वैचारिक भिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि किमान समान कार्यक्रमाच्या झेंड्याखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गरीब माणसाची उन्नती हा या सरकारचा मुख्य कार्यक्रम राहिला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हे आश्वासन जनतेला दिले होते. त्याची पूर्ती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात करण्यात आली. शिवाय ही कर्जमाफी किचकट कागदपत्रांशिवाय आणि तत्काळ देण्यात आली. लोकांचे प्रश्न समजून घेण्याची आणि ते सोडविण्याची संवेदनशीलता असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने कोरोना विरोधात जो लढा दिला त्याचे जगभर कौतुक झाले. याउलट इतर राज्यांमध्ये दिसलेले चित्र विदारक होते, गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगत होते. 

महसूल विभागाने स्टॅम्प ड्युटीत सवलत दिल्याने गृह खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. ग्राहकांचा फायदा झाला. सरकारला महसूल मिळाला आणि बांधकाम व्यवसायात तेजी आली.

 महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात ई- पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक ॲपवर नोंदणी केली आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुलभ होणार आहे.

दोन वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. केंद्रातील सत्ताधारी आणि त्यांच्या दबावाखाली असलेल्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी या संस्था, आयटी सेल सर्वांनी आघाडी सरकार पाडण्यासाठी नेत्यांच्या घरावर, राजकारणाशी संबंध नसलेल्या नातेवाइकांच्या घरावर धाडी घातल्या, मात्र सरकार पाडण्यात यश आले नाही. 

काँग्रेसचे सर्व मंत्री लोकहिताच्या दृष्टीने निर्णय घेत आहेत. जनतेलाही काँग्रेसची भूमिका पटलेली आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घवघवीत यश मिळाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी