शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मोठ्या प्रकल्पांच्या निव्वळ घोषणाच

By admin | Published: February 07, 2016 12:10 AM

गाजावाजा करीत शिवसेना-भाजपा युतीने जाहीर केलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा पुन्हा केवळ अर्थसंकल्पातच झळकत असल्याचे उघड झाले आहे़ यापैकी अनेक प्रकल्पांच्या

मुंबई : गाजावाजा करीत शिवसेना-भाजपा युतीने जाहीर केलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा पुन्हा केवळ अर्थसंकल्पातच झळकत असल्याचे उघड झाले आहे़ यापैकी अनेक प्रकल्पांच्या डेडलाइनबरोबरच त्यांचा खर्चही दरवर्षी वाढत गेल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा भार पडत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे असे प्रकल्प मुंबईकरांच्या डोळ्यांत निव्वळ धूळफेक ठरत आहेत़दरवर्षी विविध प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्यानंतरही कामे वेळेवर होत नाहीत़ त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूद वाया जाते, याबाबत खुद्द आयुक्त अजय मेहता यांनी सन २०१६-२०१७च्या अर्थसंकल्पातून नाराजी व्यक्त केली आहे़ याबाबत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना फैलावर घेऊन नियोजनबद्ध काम करण्याची ताकीदच दिली आहे़ हाती घेतलेला प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची डेडलाइनच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे़त्यांच्या धाकामुळे नवीन प्रकल्पांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे़ मात्र यापूर्वीच्या अनेक महत्त्वाकांक्षी व मोठ्या प्रकल्पांची गाडी अद्यापही रुळावर आलेली नाही़ यामध्ये भायखळा येथील राणीच्या बागेचे नूतनीकरण, पवई येथे पक्षी उद्यान, सिंगापूरहून येणारे पेंग्विन, पम्पिंग स्टेशन, अग्निशमन दलाचे कमांडिंग सेंटर्स अशा काही प्रकल्पांचा समावेश आहे़ पवई येथील पक्षी उद्यानाची हीच अवस्था़ विशेष म्हणजे या जमिनीचे मालक असलेल्या पालिकेच्याच पाणी खात्याने या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे़ त्यामुळे २०१२पासून पक्षी उद्यानाची एक वीटही रचली गेलेली नाही़पम्पिंग स्टेशनचे कागदी घोडे२६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुरानंतर मुंबईत ८ पम्पिंग स्टेशन बांधण्याची घोषणा करण्यात आली़ मात्र गेल्या १० वर्षांमध्ये केवळ दोनच पम्पिंग स्टेशन चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होऊ शकले आहेत़ गेल्या वर्षी आणखी दोन पम्पिंग स्टेशनला गती मिळाली़ तर रे रोड येथील ब्रिटानिया आणि खार रोड येथील गझदरबंद पम्पिंग स्टेशनची डेडलाइन पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे़ या पम्पिंग स्टेशनची कामे गेल्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते़ या पम्पिंग स्टेशनमुळे हिंदमाता, अभ्युदय नगर, जिजाबॉय लेन, रे रोड, खार, सांताक्रुझ आणि वांद्रे या विभागांना पावसात पाणी तुंबण्यापासून दिलासा मिळणार होता़ परंतु आता या प्रकल्पांना मे २०१६पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे या रहिवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)राणीची बाग प्राण्यांच्या प्रतीक्षेतभायखळा येथील प्रसिद्ध राणीची बाग म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय़ सिंगापूरच्या धर्तीवर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय बांधण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी २००७मध्ये केली़ मात्र हा प्रकल्प पुरातन वास्तू समिती, प्राणिमित्र संघटना आणि सेंट्रल झू आॅथोरिटी यांच्या कातरीत सापडला़ या अडचणी पार करीत हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचेपर्यंत यासाठी मंजूर ३२५ कोटींचा खर्च दीडशे कोटींवर आणण्यात आला़ मात्र कामे अद्यापही धीम्या गतीने सुरू आहेत. प्राण्यांची संख्या मात्र दरवर्षी कमी होत असल्याने पिंजरे ओस पडले आहेत़अत्यावश्यक सेवा प्रकल्पही रखडलेलेचदीड कोटी लोकसंख्येपुढे अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याने अद्ययावत सहा कमांडिंग सेंटर्स बनविण्याची घोषणा पालिकेने केली़ त्यानुसार बोरीवली, विक्रोळी, भायखळा, मरोळ, मानखुर्द आणि वडाळा असे सहा सेंटर्स तयार होणार होते़ यामुळे आगीच्या घटना घडल्यास त्या त्या केंद्रातील हे सेंटर्स मदतकार्य पोहोचविणार होते़ परंतु आतापर्यंत केवळ वडाळ्याचेच कमांडिंग सेंटर सुरू झाले आहे; उर्वरित सर्व कमांडिंग सेंटर्स अद्यापही धूळखात पडले आहेत़