शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्करोग रुग्णांसाठी बिग बींचा रॅम्प वॉक!

By admin | Published: March 01, 2017 2:21 AM

कर्करोगग्रस्तांसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ‘केअरिंग विथ स्टाईल’ या फॅशन शोचे आयोजन केले होते.

मुंबई : कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीएए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगग्रस्तांसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ‘केअरिंग विथ स्टाईल’ या फॅशन शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये शो स्टॉपर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांच्यासोबत रॅम्प वॉक केला.बिग बी यांनी सीपीएएसाठी ११ लाख रुपयांचा निधीही दिला. या वेळी बिग बी म्हणाले की, परोपकारी सेवा संस्था या दानावर चालतात. त्यात आपल्याला जितके योगदान देता येईल, तितके देण्याचा प्रयत्न करत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त लहान मूल पाहणे फारच त्रासदायक आहे. अशा मुलांना आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने आणि आरोग्यदायी जगता यावे, म्हणून मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.या शोमधून उभा करण्यात आलेला निधी सीपीएएतर्फे मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावर उपचारानिमित्त खर्च केला जाईल. फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांसह सध्याच्या चालू कलेक्शनमार्फत फॅशन डिझायनर शायना एन.सी. यांनी तयार केलेली डिझाइन या वेळी सादर करण्यात आली. या वेळी शायना एन.सी. म्हणाल्या की, या अनोख्या उपक्रमातून एकोपा आणि कठीण रोगाशी सामना करण्याची जिद्द प्रतित होते. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाशी संलग्नित राहून कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. काही अंशी त्यात सफल होत असून या संस्थांसोबत काम करणे ही भाग्याची गोष्ट आहे. यापुढेही कर्करोगग्रस्त मुलांच्या जीवनात आशेचा किरण जागवण्याचा प्रयत्न सुरू राहील. (प्रतिनिधी)