मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावर अखेर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाच रणांगणात यावे लागले आहे. राजभवनाच्या आवारात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाची भुमिका स्पष्ट केली.
भाजपाची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर पुन्हा तासाभराने दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यातील नेत्यांसह भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव हेदेखील उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. भाजपाची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर पुन्हा तासाभराने दुसरी बैठक घेण्यात आली. ही बैठक नुकतीच संपली असून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजभवनाकडे रवाना झाले. राजभवनाच्या आवारात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाची भुमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले .शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी बरोबर येऊ इच्छित नाही. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. हा जनादेश सोबत मिळून काम करण्यासाठीचा होता. शिवसेनेकडून त्याचा अपमान होत आहे. जनतेच्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करायचं असेल, तर ते करू शकतात, आमच्या शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.