सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवार राजभवनवर; मंत्रिपदाची शपथ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:45 PM2023-07-02T13:45:19+5:302023-07-02T16:00:33+5:30
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
मुंबई-महाराष्ट्राच्याराजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत. 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde reaches Raj Bhawan where NCP leader Ajit Pawar and other NCP leaders are present. pic.twitter.com/Bjjl2V6Pvg
— ANI (@ANI) July 2, 2023
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभावनात दाखल झाले आहेत. याशिवाय, भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे जवळपास सर्वच नेतेही राजभवनात आले आहेत. राजभवनात शपथविधीची तयारी झाली असून, येत्या काही वेळात शपथविधी सोहळा होणार आहेत.
Mumbai: We are going to Raj Bhavan along with CM Shinde. I will tell you after the meeting, says Maharashtra Minister Uday Samant pic.twitter.com/leq4qv11lW
— ANI (@ANI) July 2, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार,छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ,अनिल भाईदास पाटील,आदिती तटकरे
संजय बनसोडे, बाबूराव अत्राम, हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.