मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसह २७ जणांची बदली करीत मोठा खांदेपालट केला.एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देत, आर. ए. राजीव यांची त्यांच्या जागी एमएमआरडीएमध्ये बदली करण्यात आली आहे. राजीव वित्त विभागात प्रधान सचिव (व्यय) होते. एमएमआरडीएचे आयुक्तपदहे अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे आहे, पणते पदावनत करून राजीव यांना देण्यातआले आहे.सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचीबदली मुख्यमंत्री कार्यालयातप्रधान सचिवपदावर करण्यातआली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंहपरदेशी हे कायम राहतील आणि गगराणी त्यांच्या सोबतीला असतील. या दोघांशिवाय, प्रधान सचिव (विशेष प्रकल्प) अनिल डिग्गीकर हे मुख्यमंत्री कार्यालयात आहेतच. अशा प्रकारे तीन कार्यक्षम आयएएस अधिकाºयांची टीम निवडणुकीच्या सव्वा वर्ष आधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यात घेतली आहे.दिल्लीच्या महाराष्ट्र सदनचे आयुक्त लोकेशचंद्र यांना महाराष्ट्रात परत आणले असून, त्यांची नेमणूक सिडकोचेउपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संतोष कुमार लघू उद्योग विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव एम.एन.केरिकेट्टा यांच्यावर खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.
राज्य प्रशासनात मोठा खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:23 AM