शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुंबई-पुण्याबाहेरील कलावंतांमध्ये मोठी क्षमता - फय्याज

By admin | Published: February 20, 2016 3:16 AM

संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर १०-१२ शाखांना भेटी दिल्या. नव्या गायकांचे गाणे ऐकले. मुंबई-पुण्याबाहेरसुद्धा खूप मोठी क्षमता असल्याची प्रचीती मला आली

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर १०-१२ शाखांना भेटी दिल्या. नव्या गायकांचे गाणे ऐकले. मुंबई-पुण्याबाहेरसुद्धा खूप मोठी क्षमता असल्याची प्रचीती मला आली. ते शोधून काढण्याची गरज माजी संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज शेख यांनी व्यक्त केली. ९६ व्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात फय्याज यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, वर्ष कसं सरले, कळलेच नाही. म्हणताम्हणता ९६ वे संमेलन आले. मालवणी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देणारे गंगाराम गवाणकर संमेलनाध्यक्ष झाले, त्याचा सबंध महाराष्ट्राला आनंद झाला. या वेळी त्यांनी ठाण्याचे रसिक दाद देणारे आहेत. हे शहर कलावंतांची रंगभूमी असल्याचेही त्या म्हणाल्या. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक न घेता जाणकार रंगकर्मी, नियामक मंडळ आणि मध्यवर्तीच्या कार्यकारिणीने एकमताने निवड करावी. त्यात रंगमंचाच्या मागे काम करणारे नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार अशांचाही समावेश असावा, असेही त्या म्हणाल्या. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, बॅकस्टेज आर्टिस्टला वेगवेगळी कामे करताना अपघात होत असतात. त्यांना जे रुग्णालये महानगरपालिकांतर्गत येतात, तिथे २ बेड असावेत, अशी मागणी केली. शासन, महानगरपालिकांची नाट्यगृहे बालनाटकांसाठी सवलतीच्या दरात मिळावीत, असे सांगत परिषदेचे यशवंत नाट्यगृह आम्ही अर्ध्या दरात देतो, असे सांगितले.