नाशिक : अनधिकृत बांधकामांना सरसकट संरक्षण देण्याच्या निर्णयात मोठी ‘डील’ झाल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ग्राहकांना फसविणाऱ्या बिल्डरांवर का कारवाई होत नाही? मुख्यमंत्र्यांनी बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा करताना बिल्डरांना अटक करू, असे सांगावयास हवे होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट येणार आहे. कोणताही विषय नसताना मंत्रिमंडळाची तातडीची बैठक का घ्यावी लागली? त्यांना बिल्डर लॉबीची माणसे भेटली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे माहिती नाही, पण या प्रकरणात सरकारचे ‘डील’ झाल्याचे ते म्हणाले. अधिकृत आणि अनधिकृत बांधकाम हे सरकार नेमके कसे ठरविणार? ग्राहकांची चूक नसताना फसविणारे बिल्डर, महापालिकांचे दोषी अधिकारी, नगरसेवक व आमदारांवर कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.रिक्षा जाळणे, आग लावणे हा पक्षाचा कार्यक्रम नसून तो अन्यायाविरोधातील राग आहे. परवाने देण्यात मराठी माणसांना डावलून परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असल्याने मी मत मांडले. नवीन रिक्षा रस्त्यावर आल्यानंतर आंदोलन होईल, असा माझ्या भाषणाचा सूर होता. परप्रांतीयांसाठी हे रिक्षाचे परवाने नसून अनधिकृतपणे मतदारसंघ बळकावण्याचे परवाने आहेत, असे ते म्हणाले.विषय ‘बजाज’शी संबंधित नाहीरस्त्यावर येणाऱ्या नवीन रिक्षा जाळण्यापेक्षा, त्यांचे उत्पादन करणाऱ्या बजाज कंपनीसमोरच आपण आंदोलन का करत नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर, राज यांनी माझा विषय सरकारशी संबंधित आहे, बजाजशी नाही, असे सांगत विषयाला बगल दिली. आरटीओची रूम पैशांनी भरली!रिक्षा परवाने देण्यासाठी झालेल्या मुलाखतीच्या वेळी एका कागदासाठी पैसे गोळा केले गेले. त्यामुळे आरटीओ कार्यालयाची अख्खी रूम पैशांनी भरली होती, असेही राज म्हणाले.
अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यात मोठी ‘डील’
By admin | Published: March 13, 2016 5:06 AM