नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:46 PM2023-07-05T18:46:42+5:302023-07-05T18:47:45+5:30

माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला आहे. - सरोज अहिरे

Big death of new MLA's! Ajit pawar or Sharad Pawar, Saroj Ahire said how they will choose in NCP politics maharashtra | नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

googlenewsNext

राष्ट्रवादीतील बंडाळीवर अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक निवडणे अवघड आहे. नवीन आमदारांचे प्रचंड मरण आहे, असे त्या म्हणाल्या. आज त्या दोन्ही गटांच्या बैठकांना गैरहजर होत्या. याचे कारणही त्यांनी सांगितले. 

आमच्या सारख्या आमदारांची अडचण होत आहे. माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. त्यामुळे मी सही केली आणि शपथविधीला गेले. सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांशीही बोलले. चार तारखेला माझी सर्जरी होती. माझे बाळ लहान असल्याने मी निघून आले. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास, म्हणून मी सही केली होती. इतर आमदारांनी पण सही केली होती, असा गौप्यस्फोट सरोज अहिंरेंनी केला आहे.  

जनतेच्या मतावर मी आमदार झाले आहे. मतदारांचा कौल घेऊन निर्णय घेणार आहे. माझी मानसिक स्थिती नाही. मला चॉइस करता येत नाहीय. मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला आहे. दोघांपैकी एकाला निवडणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे. आमचे असे क्षेत्र त्यात चर्चा होणारच, काही लोक असमाधानी म्हणून त्यांनी तक्रार केली असेल. माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी आहे. एक वर्षांनी निवडणुका म्हणून हा मोठा प्रश्न आहे. रुग्णालयातील आटोपले की मी बोलणार आहे, असे त्या म्हणाल्या. 

आई आणि बायको यातून निवडणे जसे कठीण तसे ही बाब माझ्यासाठी कठीण आहे. येवल्यात होणाऱ्या सभेत मी बरे वाटले तर जाणार आहे. काही कामांना स्थगिती होती, सीएमना हात जोडून स्थगिती उठवली आहे. जनता म्हणाली, कामे नको म्हणाली तर शरद पवारांबरोबर जाईन. पण विकासकामे म्हटले तर अजित पवारांसोबत जाणार, असे अहिरे यांनी स्पष्ट केले. 
राजकारणात कधी काहीही होऊ शकते मी आकलन करू शकत नाही. मतदार संघातील प्रमुख लोकांशी वन टू वन चर्चा करेन व नंतर माझी भूमिका जाहीर करेन, असे अहिरे म्हणाल्या. 

Web Title: Big death of new MLA's! Ajit pawar or Sharad Pawar, Saroj Ahire said how they will choose in NCP politics maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.