दुर्गेश मोरे । पुणे : आरोग्यविषयक समस्या; तसेच शासनस्तरावर असलेल्या आरोग्यदायी योजनांबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात प्रथमच 'महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल-२०२० ' चे आयोजन करण्यात आले आहे़ दरम्यान, यावेळी राज्यस्तरीय आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट आणि माहितीपट अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ़ कैैलास बाविस्कर यांनी दिली.आरोग्य विभागातर्फे मेळावे, शिबिरांद्वारे जनजागृती करण्यात येते; परंतु आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे़. यावर वारंवार विविध उपाय-योजनाही करण्यात आल्या असून, अनेक नवनवीन उपक्रम राबवून विविध आजारांवर शासनाकडे असणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम सुरू आहे़. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे़. २९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफआय) भांडारकर रोड येथे हे फेस्टिव्हल होणार आहे़. यामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची; तसेच आजारांबाबत माहिती मिळणार आहे़. जेणेकरून कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेणे शक्य होईल. चित्रफितींचा प्रभाव मानवी जीवनावर अधिक होत असल्यामुळे; तसेच नवोदितांसाठी एक चांगली संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलमध्ये आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट आणि माहितीपट अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेणार आहे. यामध्ये माता आरोग्य, बाल आरोग्य, मानसिक आरोग्य, टीबी यांसारख्या आजारांवर आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट (१ मिनिट), तर माहितीपट (१० मिनिटे) तयार करावयाचा आहे़. या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून, महाआरोग्य फि ल्म फे स्टिव्हलच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे़ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १ फेब्रवारी २०२० अंतिम मुदत आहे............1आरोग्यविषयक व्हिडिओ स्पॉट (१ मिनिट), तर माहितीपट (१० मिनिटे) अशा दोन प्रकारांमध्ये होणाºया स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहे़ तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात येणार असून त्याद्वारे विजेत्यांची निवड होईल़............2 प्रथक क्रमांकासाठी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख २५ हजार रुपये, द्वितीय स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख १५ हजार रुपये, तृतीय स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख १० हजार रुपये, तर उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र; तसेच रोख ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.............आतापर्यंत राज्यातून सुमारे ६० ते ७० जणांनी या स्पर्धेची माहिती घेतली आहे़, तर संकेतस्थळावर चार ते पाच जणांनी नावनोंदणीही केली आहे़ अंतिम मुदतीपर्यंत २० ते ३० स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याचे राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक कैैलास बाविस्कर यांनी सांगितले़
राज्यात पहिल्यांदाच ‘महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हल’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:12 PM
आरोग्य विभागातर्फे मेळावे, शिबिरांद्वारे जनजागृती करण्यात येते; परंतु आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे़.
ठळक मुद्देकैैलास बाविस्कर : जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचा उपक्रम, दोन प्रकारांत होणार स्पर्धाविविध आजारांवर शासनाकडे असणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम सुरू २९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफआय) भांडारकर रोड येथे हे फेस्टिव्हल होणार