भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. परंतु त्यानंतर आता सक्तवसूली संचलनालयानं एकनाथ खडसे यांना समन्स बजावलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसूली संचलनालयानं (ED) समन्स बजावलं आहे. तसंच त्यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.