मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. मिशन बिगीन अगेनच्या दोन टप्प्यांमध्ये सारेच व्यवसाय सुरु झाले होते. मात्र, हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. आता राज्यभरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये नसलेली हॉटेल्स, लॉजिंग येत्या 8 जुलैपासून सुरु होणार आहेत. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले होते. यानंतर आज याचे आदेश काढण्यात आले आहेत.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांसाठी तसेच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली आहे. याठिकाणच्या कन्टेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेलना ही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकणार आहेत.
तसेच उर्वरित राज्यासाठीदेखील 33 टक्के क्षमतेची अट घालण्यात आली आहे. हे हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे. तसेच 33 टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली 67 टक्के क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे अधिकार हे सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी ठाकरे यांनी हॉटेल मालकांना कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले आहे. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात. राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार
अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट
धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302 रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत