मोठी बातमी! जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र ठरविण्यासाठी अजित पवारांचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 05:43 PM2023-07-03T17:43:57+5:302023-07-03T17:45:01+5:30
राजकीय पक्षांमध्ये असे काही प्रसंग निर्माण झाले तर त्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे आयोग सांगतो. हे सर्व पकडून पुढे चाललो आहोत.- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका देणाऱ्या जयंत पाटील आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड यांना अजित पवारांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
शरद पवारांना 'चेकमेट'! प्रफुल्ल पटेलांनी सर्व अधिकार हाती घेतले, अजित पवार विधिमंड़ळ नेतेपदी
९ जणांवर कारवाई करावी असे बोलण्यात आले आहे. मी सांगू इच्छितो, की जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलेले आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. यामुळे शहला काटशहचे राजकारण राष्ट्रवादी पक्षात सुरु झाले आहे.
राजकीय पक्षांमध्ये असे काही प्रसंग निर्माण झाले तर त्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे आयोग सांगतो. हे सर्व पकडून पुढे चाललो आहोत. आमदरांच्या विकासकामांचे प्रश्न, निधी, स्थगिती उठविणे आदी प्रयत्न करणे हे आमचे काम असते. ते एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्यासोबत महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने करून दाखवेल हा विश्वास मी जनतेला, आमदारांना, सगळ्या अध्यक्षांना देतो. बंडे केले की नाही हे कायदा ठरवेल, असे अजित पवार म्हणाले, असे अजित पवार म्हणाले.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...
प्रफुल्ल पटेल यांनी मी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांची विधिमंडळ नेता, प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. अजित पवार विधिमंडळ पक्षाचे नेते यांची निवड झाली आहे. ही नियुक्ती पक्ष करतो. नव्या नियुक्त्यांबाबत विधानसभा अध्यक्षांना कालच कळविले आहे. पक्ष व्हीप नेमतो, त्यानुसार अनिल पाटील यांना महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या प्रतोदपदी नेमले आहे. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. पुढे जी संघटनात्मक कारवाई करायची असेल ती केली जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.