शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 11:47 AM

Lok Sabha Election: जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आलेली असतानाही महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाड्यांमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचं चित्र होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघांतील चित्र अजूनही अस्पष्ट आहे. मात्र आता महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून उद्या सकाळी ११ वाजता मविआकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषेदला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

जागावाटपावरून महाविकास आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. मविआतील तीन प्रमुख पक्षांची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटप निश्चित न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सांगली आणि मुंबईतील दोन जागांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन पक्षांत संघर्ष सुरू झाल्याने जागावाटप लांबणीवर पडले. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी तर ठाकरे यांच्या पक्षाची थेट आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली. मात्र जागावाटपाचा हा तिढा अखेर सुटला असल्याचं सांगण्यात येत असून उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबाबतची घोषणा केली जाईल.

वादाग्रस्त जागांबाबत काय निर्णय होणार?

महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडली. या जागेवर काँग्रेसने दावा सांगितलेला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट आपल्या उमेदवाराचीही घोषणा करून टाकली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नाराज काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेऊन या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्नशील आहेत.  "सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा सांगलीच्या एखाद्या जनावरालासुद्धा विचारलं तर ते सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे," असा टोला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना लगावला होता. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत उद्या नेमकी काय घोषणा करण्यात येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले