शहरं
Join us  
Trending Stories
1
“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले
2
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
3
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात
4
धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी
5
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
6
सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...
7
"टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातच्या बस कशासाठी?…हा महाराष्ट्राचा अपमान’’, आदित्य ठाकरे संतापले
8
हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या
9
शुभंकर तावडेने दिली प्रेमाची कबुली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो
10
Video: माझी पंढरीची माय... वारकऱ्यांबरोबर रमला अभिनेता संदीप पाठक, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
11
रोहित शर्माच्या हातातील ट्रॉफी प्लॅटिनमची की चांदीची? खरी की रिप्लिका? मोठी माहिती समोर
12
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालू खऱ्या आयुष्यात पण आहे प्रेमात, अभिनेत्रीने दिली ही हिंट
13
राहुल गांधी हाथरसला जाणार, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार!
14
'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...
15
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशाने शेअर केला व्हिडिओ, म्हणते- "मला तुम्हाला सांगायचं आहे की..."
16
वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...
17
हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  
18
"अदानीपासून मुंबईला वाचवा, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
19
Jayant Patil : 'सोबत असणारे लोकच अजित पवारांवर टीका करतात'; जयंत पाटलांनी डिवचलं
20
'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 2:14 PM

Ambadas Danve Latest News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणलेल्या राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली.

राहुल गांधी यांनी हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. प्रसाद लाड यांना हासडलेली शिवी दानवे यांना महागात पडली असून त्यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणलेल्या राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली आणि सभागृहाच्या परंपरेचा चिंधड्या उडाल्या. आपल्या जागेवरून बाहेर येत दानवे यांनी लाड यांना थेट शिवीच हासडल्याने झालेल्या हमरीतुमरीत सभागृहातली चर्चा की गल्लीबोळातले भांडण याचे भानही सदस्यांना राहिले नाही. 

राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव  करण्याची परवानगी लाड यांनी मागितली. मात्र,  उपसभापतींनी त्यांना नंतर चर्चा करू, सांगत खाली बसवले. यावेळी लाड यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले. कामकाज सुरू झाल्यानंतर लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा, अशी मागणी केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले असता लाड यांनी हातवारे केले. त्याला आक्षेप घेताना दानवे यांचा तोल ढासळला. आपल्या जागेवरून बाहेर येत त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. लाड यांच्याकडूनही शिवीगाळ झाली. अखेर उपसभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. यावरून दानवे यांनी आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे म्हटले होते.

दानवेंना पश्चाताप नाही...मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकाच्या बाण्यानं उत्तर दिलं. समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी बोललो ते बोललो, पळपुटा थोडी आहे. हिंदुत्व वैगेरे प्रसाद लाड यांच्यासारखे बाटगे लोक शिकवतात, जे धंद्यापाण्यासाठी जिथे सत्ता आहे तिथे घुसतात. तसं आम्ही नाही. हे लोक आम्हाला हिंदुत्व काय शिकवणार, हिंदुत्वासाठी काय काय करावं लागते आणि याआधी काय केले हे त्यांना माहिती नाही. मी सभापतींशी बोलत होतो. सभागृहात सभापतींसमोर बोलले पाहिजे. माझ्याकडे हातवारे, अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती. विरोधी पक्षनेता हा आक्रमकच असला पाहिजे असंही अंबादास दानवेंनी म्हटले होते.   

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाड