Harshvardhan Patil ( Marathi News ) : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे. यामुळे ऊ, उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी मोलॅसिसपासून बीहेव्ही मोलीसेस आणि ज्यूस व सिरप पासून इथेनॉल करण्यासाठी बंदी घातली होती. यामुळे शेतकऱ्यांचे आणि खारखानदारांचे नुकसान झाले होते.
ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?
यावरील बंदी उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून सुरू होती. याबाबत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मागणी केली होती. यावर आता केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली."आज केंद्र सरकारने २०२३ ला मोलॅसिसपासून आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. आम्ही याबाबत राष्ट्रीय साखर संघामार्फत पाठपुरावा करत होतो. पेट्रोल मंत्री, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांना पत्र दिलं होतं. आता केंद्र सरकारने ती बंदी उठवली आहे. आता २०२४-२५ च्या गळीत हंगामात ज्या कारखान्यांकडे डिस्टलरी आहे त्यांना इथेनॉल काढायला परवानगी मिळणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
"केंद्राने चांगला निर्णय घेतला आहे, राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मला वाटतं आता देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. २०२४ -२५ च्या गळीत हंगामात साखरेपेक्षा इथेनॉलला चांगला दर मिळेल. यामुळे आपल्या ऊसालाही चांगला दर मिळेल. यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय सारख संघातर्फे मी केंद्रीय मंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानतो, असंही पाटील म्हणाले.
"वास्तविक पाहता सिरप आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिसाठी जवळपास ५० हजार कोटींची जास्त गुंतवणूक ही सहकारी आणि खासगी कारखान्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानेच केली होती. परंतु साखरेचा तुटवडा भासेल की काय अशा बातम्या समोर आल्या तेव्हा बंदी घातली होती. याचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असंही भाजपा नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले.