खंडाळा (जि. सातारा) : सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात देशात उल्लेखनीय काम केले आहे. शेतकºयांसाठी पारदर्शक काम करणा-या या बँकेची चौकशी राज्य सरकार करते आहे. मोदी सरकारच्या काळात चोºया करणारे परदेशात मोकाट फिरतात. मात्र दुष्काळात छावण्या उभारून पशुधन वाचविणारे चौकशीच्या फे-यात अडकतात, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.संसदीय कारकिर्दीस पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांचा लोणंद (जि.सातारा) येथे सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, सत्तेचा वापर शेवटच्या घटकातील माणसांसाठी अखंडपणे करायचा असतो, ही आमची शिकवण आहे. सरकारने खुशाल चौकशी करावी. आम्ही सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी सोडणार नाही.सध्याचे राज्य सरकार चौकशीवर खूप प्रेम करणारे आहे. त्यामुळे हे सरकार कुणासाठी आलंय हेच कळत नाही.
‘मोठे चोर परदेशात; शेतकरी चौकशीच्या फे-यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:15 AM