माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व लोकमतचा उपक्रम
१८ ऑगस्ट रोजी पुण्यात रंगणार सोहळा
पुणे : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि लोकमत यांच्या वतीने देशसेवेसाठी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न बाळगून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते सत्यात उतरविलेल्या अधिका:यांचा सन्मान केला जाणार आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी गणोश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2क्13मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेले देशभरातील भावी अधिकारी या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नवीन प्रशासकीय अधिकारी निवडीसाठी ‘यूपीएससी’मार्फत नागरी सेवा परीक्षा घेतल्या जातात. देशातील भौगोलिक, सामाजिक वैविध्यता आणि त्या भागातील तरुणांमधील गुणवत्ता हेरून त्यांची देशसेवेसाठी निवड करण्याचे महत्त्वाचे काम ‘यूपीएससी’ करते. या परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या तरुण-तरुणींनी त्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले असतात. देशसेवेसाठी त्यांची निवड झाल्यानंतर या परिश्रमाचे चीज तर होतेच; पण त्यांच्या या अथक प्रयत्नांना दाद देत पाठीवर थाप देणोही महत्त्वाचे आहे.
याच सामाजिक भावनेतून माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि लोकमतच्या वतीने त्यांचा सत्कार केला जाणार आहे. देशाच्या कानाकोप:यांतून नव्याने निवड झालेले 2क्क्पेक्षा जास्त भावी अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र येत संवाद साधणार असल्याने पुण्यातील तरुण-तरुणींसाठी पर्वणी ठरणार आहे. 2क्13 साली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्याथ्र्याचा देशातील पहिल्यांदाच असा भव्य सत्कार सोहळा होत आहे.
लोकमतनेही सामाजिक जाणिवेतून वेळोवेळी युवक-युवतींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले
आहे. त्यांच्यातील कलागुण
आणि गुणवत्तेला सन्मान प्राप्त करून दिला आहे. याच जाणिवेतून लोकमतने राष्ट्रीय सत्कार
सोहळ्याला अधिकाधिक जनतेर्पयत पोहोचविणो व तरुणांसमोर
आदर्शवाद निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले
आहे.
(प्रतिनिधी)
संपूर्ण देशातून तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या विद्याथ्र्यामधून निवड झालेल्या या भावी अधिका:यांकडून देशाला फार मोठय़ा अपेक्षा आहेत. देशाचा प्रशासनाचा गाडा ओढत असताना सामाजिक बांधिलकीचा विचार त्यांना करावा लागतो. देश घडविण्याच्या प्रक्रि येत कळीचे स्थान असलेल्या अधिका:यांना कारकिर्दीच्या पहिल्याच टप्प्यावर होणारा हा कौतुक सोहळा बळ देणारा ठरणार आहे. ‘लोकमत’ या सोहळ्यात सहभागी होत आहे, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. ‘आक्रमक तरीही विधायक पत्रकारिता’ हे ‘लोकमत’चे ब्रीद वाक्य आहे. त्यामुळेच प्रशासनावर पत्रकारितेच्या माध्यमातून अंकुश ठेवत असतानाच समाजाभिमुख काम करणा:या अधिका:यांच्या पाठीशी ‘लोकमत’ नेहमीच उभे राहते.
ऋषी दर्डा
संपादकीय संचालक व सह व्यवस्थापकीय लोकमत मीडिया प्रा. लि.
‘यूपीएससी’ परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे
2क्क् भावी अधिका:यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणत त्यांचे कौतुक करताना आम्हाला अभिमान वाटत आह़े मागील पाच वर्षापासून असा सत्कार सोहळा आयोजित केला जात आहे. परीक्षेतील पहिले तीनही टॉपर्स दर वर्षी या सोहळ्याला आवजरून उपस्थित राहतात. जे तरुण-तरुणी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा सोहळा खूप महत्त्वाचा ठरेल. राजकारणाचे धडे देणारी संस्था सुरू केल्यानंतर भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना एकत्र आणले. त्याचाच एक भाग म्हणून या सोहळ्याचे आयोजन केले जाते.
राहुल कराड
संस्थापक व अधिष्ठाता, एमआयटी स्कूल
ऑफ गव्हर्नमेंट.
- देशभरातून यशस्वी कअर, कढर, कऋर आणि कफर उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येणार.
- महाराष्ट्रातील विद्याथ्र्याना मिळणार यशाचा कानमंत्र.
- दिवसभर विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रंचे आयोजन.
- विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार मान्यवरांचा गौरव.