पुणे : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाने देशासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. आर्थिक बेशिस्त आणि नियोजनाच्या अभावामुळे उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचे मूल्य घसरत चालले आहे. वित्तीय तुट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणताही ' रोडमॅप' नाही. त्यामुळे २०२० हे वर्ष आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भयंकर असेल, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार आनंद शर्मा यांनी व्यक्त केले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शर्मा यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या जरिता लेतफ्लँग, माजी खासदार रजनी पाटील, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते. शर्मा म्हणाले, की सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षातील कामाचा हिशेब जनतेसमोर मांडणे गरजेचे होते. राज्याशी संबंध नसलेले विषय मांडले जात आहेत. आपल्याकडे व्यक्तीवाद वाढला असून तो लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीकी शर्मा यांनी केली.नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा, अशा शब्दांत शर्मा यांनी पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मनभेद निर्माण केले जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. ---------अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी कराभुकेच्या निदेर्शांकात भारतापेक्षा पाकिस्तान, बांग्लादेश पुढे असल्याचे वास्तव आहे. जगातील मागासलेल्या देशांच्या पंक्तीत आपण आहोत. गुजरातमधील दोन जिल्हेही कुपोषणात आघाडीवर आहेत, अशी टीका शर्मा यांनी केली. भाजपा व शिवसेनेकडून पाच व दहा रुपयात जेवण देण्याच्या आश्वासनावर बोलताना त्यांनी अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 9:24 PM
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा,
ठळक मुद्देराष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मनभेद निर्माण अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा