मुंबई : भारत पेट्रोलियम, इंडियन आॅइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांच्या सहकार्याने देशातील सर्वांत मोठ्या ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.राज्यात रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारत पेट्रोलियम, इंडियन आॅइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. देशात सर्वांत मोठ्या रिफायनरी प्रकल्पामुळे डाऊनस्ट्रिमच्या इंडस्ट्रिजला मोठा फायदा होणार असून, जवळपास १ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे एक लाखापेक्षा अधिक प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.
कोकणात सर्वांत मोठी ‘ग्रीन रिफायनरी’
By admin | Published: January 26, 2016 3:25 AM