संदीप प्रधान, मुंबईशिवसेना आणि जनता दल (युनायटेड) यांच्यातील निवडणूक चिन्हाच्या साधर्म्यामुळे भारतीय जनता पार्टीनेच शिवसेनेला रिंगणात उतरवले. मात्र, प्रत्यक्षात नितीश कुमार यांच्याबरोबरच नरेंद्र मोदींनाही शिवसेनेच्या उमेदवारांनी खाल्लेल्या मतांचा फटका बसला, असे चित्र समोर आले आहे.निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमार यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने व भाजपावर केलेली टीका लक्षात घेता, शिवसेना अधिक आक्रमक होणार असून, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळीही भाजपाला घसरत्या लोकप्रियतेवरून खिंडीत गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत.बिहारमध्ये शिवसेना १५० जागा लढवत असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात शिवसेनेने ८५ उमेदवार रिंगणात उतरवले होते व त्यापैकी ३७ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते. शिवसेनेला ४२ मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली असून, ती सुमारे अडीच लाखांच्या आसपास आहेत. या मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांनी मते खाल्ल्यामुळे भाजपालाही फटका बसला आहे.बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याने सांगितले की, जदयू व शिवसेना यांचे चिन्ह सारखी असल्याने, आम्ही उमेदवार उभे केले असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात आम्ही शिवसेनेचे वेगळे चिन्ह असल्याचे मतदारांवर ठसवले. त्यामुळेच लोहका मतदारसंघातील मनोजकुमार या शिवसेनेच्या उमेदवाराला १४ हजार ४५६ मते मिळाली. लकीसराय येथे रामप्रसाद मंडल याने ११ हजार ५५१ मते, भोचहा येथे रमईराम याने ११ हजार ८३६, बलरामपूरमध्ये ९ हजार ४७३, मोरबा येथे ९ हजार ३८०, जमालपूरमध्ये ८ हजार २८१ अशी लक्षणीय मते मिळवली. भाजपाने हिंदुत्वाबाबत केलेली धरसोड, आरक्षणाच्या प्रश्नाला हात घालण्याची चूक याचा फटका त्यांना बसला, असे मत बिहार निवडणुकीकरिता शिवसेनेचे प्रभारी व कामगार नेते सुनील चिटणीस यांनी व्यक्त केले. संघ मुख्यालयाबाहेर काँग्रेसकडून आतषबाजीनागपूर : बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपराजधानीत जोरदार जल्लोष केला. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आतषबाजी करण्यात आली, तसेच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर, मागील आठवड्यात विदर्भात नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेले यश व आता बिहारमधील महाआघाडीचा दणदणीत विजय, यामुळे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.कल समोर येताच, महाआघाडीचा विजय निश्चित झाला व काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या तालावर मिरवणूक काढली. केशवद्वाराजवळ दिवाळी साजरी केली. आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीदेखील संविधान चौकात दुपारी फटाके फोडले.संघ, भाजपात निराशानिकालानंतर भाजपा कार्यालय, तसेच संघ मुख्यालयात शुकशुकाट होता, तसेच संघाकडून निकालासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
बिहारमध्ये शिवसेनेचा भाजपालाही दणका
By admin | Published: November 09, 2015 3:30 AM