शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

बळीराजाची दिवाळी अंधारातच!, व्यापा-यांनी भाव पाडले, परतीच्या पावसाने कृषीमालाची प्रतवारी खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:04 AM

परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत.

- योगेश बिडवईमुंबई : परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत. तर भारनियमनामुळे पाणी असून कृषिपंप बंद असल्याने दिवाळी अंधारातच साजरी होत आहे.विदर्भात पावसामुळे शेतमाल खराब झाल्याचे सांगत व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. गेल्या वर्षी कापसाला क्विंटलला ५२०० रुपये भाव होता. यंदा तो चार हजारांवर आला आहे. कृषीमालाची हमीभावाने खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश असले तरी व्यापाºयांनी त्यास दाद दिलेली नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’ला दिली. पावसामुळे कपाशी पडणे, बोंडे काळी होण्यासारखे संकट ओढवले आहे. चिखलामुळे कापूस वेचणीही अचडणीत आली आहे. सोयाबीन ओले झाल्याने त्यालाही भाव नाही.मराठवाड्यात कडधान्यालाही फटका बसला आहे. उदीड, मुगाला क्विंटलला ३२०० ते ३४०० रुपये भाव आहे. तर सोयाबीन २७०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.सरकारी खरेदी केंद्रावर माल खरेदी करताना अटीच खूप असल्याचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शेतकरी अविनाश गुंजकर यांनी सांगितले. हिंगोलीत दोन केंद्रे जाहीर झाले असताना अजून एकही सुरू झाले नसल्याचेही ते म्हणाले.पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही धान्य बाजारात विशेष तेजी नाही. क्विंटलमागे मका ८०० ते १३०० तर सोयाबीन २४०० ते २८०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतक-याला खर्च निघणेही अवघड झाले आहे. नाशिक, पुण्यात दिवाळीतही भाजीपाला विक्रीतून चार चांगले पैसे मिळविण्याचे शेतक-यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.गेल्या वर्षी कापसाला ५२०० ते ५५०० रु. भाव होता. या वर्षी४ हजार रुपये भाव आहे. भावाअभावी शेतक-याचे दिवाळे निघाले आहे.- विजय जावंधिया,ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनानाफेडमार्फत तेलबिया व कडधान्याची आॅनलाइन खरेदी करण्याचे आदेश सरकारने दिलेत. त्याचे राज्यातील संबंधित केंद्रांवरील कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. लवकरच खरेदी सुरू होईल. शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड१०१ केंद्रांवर हमीभावाने खरेदीराज्यात पणन मंत्रालयाकडून १०१ केंद्रांवर हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचे सरकारी पातळीवर सांगितले जात आहे. मात्र अनेक केंद्रे अजून सुरू झालेली नाहीत, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ही खरेदी केंद्रे प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात आहेत. मक्याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.आॅनलाइन खरेदीचा गोंधळआॅनलाइन खरेदीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यासाठी शेतकºयाला सात-बारा उताºयासह इतर पुरावे द्यावे लागणार आहेत. सात-बारा उताºयावर नोंद नसल्यास त्याची सरकारी खरेदी होणार नाही.शेतमाल हमीभाव प्रत्यक्ष दर(क्विंटल/रु.) (क्विंटल/रु.)भरडधान्ये ५,०५० ३२००-३४००सोयाबीन ३,०५० २६००-२७००कापूस ४,१२०-४३२० ४,०००मका १,४२५ —-

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार