शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

स्टार्ट अप कंपनी विकून मुंबईत जन्मलेले बंधू झाले अब्जाधीश

By admin | Published: August 24, 2016 4:30 AM

मुंबईत जन्मलेल्या दोन भावांनी जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप कंपनी चीनच्या कंपनीला विकून तब्बल ९00 दशलक्ष डॉलर कमावले आहेत.

मुंबई : मुंबईत जन्मलेल्या दोन भावांनी जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप कंपनी चीनच्या कंपनीला विकून तब्बल ९00 दशलक्ष डॉलर कमावले आहेत. दिव्यांक तुराखिया (३४) आणि भावीन (३६) अशी त्यांची नावे आहेत. मुंबईतील जुहू आणि अंधेरी उपनगरात वाढलेले हे बंधूद्वय कुमारवयातच व्यवसायात पडले होते. त्यांची ‘मीडिया डॉट नेट’ ही कंपनी चीनमधील ‘बीजिंग मिटेनो कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ या कंपनीने खरेदी केली आहे. (प्रतिनिधी)>जाहिरात क्षेत्रातील सर्वांत मोठा सौदाहा जाहिरात क्षेत्रातील सर्वांत मोठा अधिग्रहण आणि विलिनीकरण सौदा ठरला आहे. या पूर्वी गुगलने ७५0 दशलक्ष डॉलर मोजून ‘अ‍ॅडमॉब’ची, तर ट्विटरने ३५0 दशलक्ष डॉलर मोजून ‘मॉबपब’ची खरेदी केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, जगभरातील जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत असताना तुराखिया बंधूंनी आपली कंपनी जबरदस्त किमतीला विकण्यात यश मिळविले आहे.06 वर्षांपूर्वी तुराखिया बंधूंनी मीडिया डॉट नेटची स्थापना केली होती. दुबई आणि न्यूयार्क येथे कंपनीचे तळ आहेत. याहू आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या बड्या कंपन्यांना ती सेवा देत होती. गेल्या वर्षी कंपनीने२३0 दशलक्ष डॉलरचा व्यवसाय केला होता. अमेरिकेत राहणाऱ्या आणि अनिवासी भारतीय असणाऱ्या दिव्यांक यांनी सांगितले की, आजच्या सौद्यानंतर आम्ही व्यवस्थापन करीत असलेला व्यवसाय १.४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मीडिया डॉट नेटचे अधिग्रहण दोन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात बीजिंग मिटेनोचे चेअरमन झांग झियोंग हे गुंतवणूकदारांचा पुंज स्थापन करतील. त्यानंतर, प्रत्यक्ष अधिग्रहण प्रक्रिया पार पाडली जाईल.11 स्टार्ट अप कंपन्या वांद्र्यातील आर्य विद्यामंदिर शाळेत शिकलेल्या दिव्यांक आणि भावीन यांनी डायरेक्टी समूहाच्या छत्राखाली स्थापन केल्या आहेत.या व्यवहारानंतरही दिव्यांक तुराखिया मीडिया डॉट नेटसोबत काम करणार आहेत. भावीन हे मात्र आपली दुसरी कंपनी ‘डायरेक्टी’चा कारभार पाहतील. डायरेक्टी समूहामार्फत चार स्टार्ट अप कंपन्या चालविल्या जातात.तुराखिया बंधूंचा हा पहिलाच विक्री सौदा नाही. या पूर्वी त्यांनी डायरेक्टी अंतर्गत येणाऱ्या काही व्यवसायांची नॅसडॅकमध्ये सूचीबद्ध एंड्युरंस इंटरनॅशनल समूहाला १६0 दशलक्ष डॉलर्सला विक्री केली होती.