प्राची सोनवणे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेरुळमधील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टीन बिबरच्या म्युझिकल कॉन्सर्टचे बुधवारी, १० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी करोडोंचा खर्च करून जस्टीन बिबरच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लावण्यात आल्या आहेत. किशोर वयापासूनच तरुणांच्या गळ््यातील ताईत ठरलेला हा जस्टीन बिबर या कार्यक्रमापूर्वीच तो मुंबईत दाखल होणार आहे. याकरिता त्याने आयोजकांकडे लक्झरी मागण्यांची यादी पाठविली आहे. ही यादी प्रत्येकाला अवाक करणारी असून, सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमाचे तिकीटही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असले, तरीदेखील उच्चभ्रू वसाहतींमधील तरुणाई मात्र, जस्टीन बिबरला लाइव्ह ऐकण्यासाठी हवी ती किंमत मोजण्यास तयार आहेत. ७६ हजार रुपयांच्या तिकिटांची विक्री झाली असून, सध्या ५ हजार ते १५ हजार रुपयांच्या तिकिटांची विक्री सुरू आहे. पॉप गायक बिबरचा भारतातील लाइव्ह कार्यक्रम आणि त्याची झलक पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातील तरुणवर्ग या ठिकाणी जमणार आहे. याकरिता नवी मुंबई पोलिसांकडून विशेष फौजदेखील तयार करण्यात आली आहे. व्हाइट फॉक्स इंडियाकडून जस्टीनच्या राजेशाही थाटाची मागणी पूर्ण करण्यात आली असून, त्याकरिता काही विचित्र मागण्याही पूर्ण करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम स्थळ ते हॉटेलच्या प्रवासाकरिता रोल्स रॉइस, त्याच्यासोबत १०० जणांची टीम असणार आहे. जस्टीन बिबर परफॉर्म करण्यासाठी हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत रस्तेमार्गे नाही, तर चॉपर (हेलिकॉप्टर)ने जाणार असल्याने, याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील दोन आलिशान हॉटेल्स्चे बुकिंग करण्यात आले आहे़ जस्टीन बिबरचा ताफा नेण्यासाठी १० लक्झरी कार, २ वॉल्वो बस तैनात केल्या जाणार आहेत. त्यांच्या कॉन्सर्टसाठी केलेल्या खर्चाने व त्याला देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेने सर्वांचे लक्ष वेधले आहे़अचंबित करणारी मागण्यांची यादीजस्टीन बिबरच्या खोलीत पाण्याच्या २४ बाटल्या, एनर्जी ड्रिंकच्या ४, व्हिटॅमिन वॉटरच्या ६ बाटल्या, ६ क्र ीम सोडा आणि विविध फळांचा रस हेल्थ फूडच्या नावे नारळ पाणी, बदाम शेक, प्रोटीन पावडर, शुद्ध देशी मध, केळी आणि हर्बल टीसह ताजी फळेजस्टीन बिबरच्या जवळपास कुठेही ‘लिली’ची फुले दिसू नयेत.सोबत असलेल्या ताफ्याला सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पथक हवे.याशिवाय बिबरचे ८ सुरक्षा गार्डही त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत असतील.जस्टीन बिबर ज्या वेळी प्रवास करेल, त्या वेळी १० कंटेनर साहित्य त्याच्यासोबत असेल. यामध्ये त्याचा सोफा सेट, प्ले-स्टेशन, वॉशिंग मशिन, टेबल-टेनिसचे टेबल यासारख्या साहित्याचा समावेश आहे.पोलीस यंत्रणेवर ताण१या कार्यक्रमासाठी देशभरातील जवळपास ४५,००० चाहते या ठिकाणी येणार असल्याने त्यांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, गैरप्रकार टाळणे आदींकरिता पोलीस यंत्रणेवर चांगलाच ताण येणार आहे. २५ पोलीस अधिकारी आणि ५००हून अधिक पोलीस या दरम्यान कार्यरत असून, कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर चोख बंदोबस्त राहणार आहे.२प्रत्येक महत्त्वाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील वाहतुकीत अडथळा येऊ नये, याकरिता १०० वाहतूक पोलीस कार्यरत असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. या दरम्यान कंट्रोल रूमच्या माध्यमातून विशेष सूचना दिल्या जाणार आहेत.
जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टसाठी कोट्यवधींचा खर्च
By admin | Published: May 08, 2017 4:39 AM