मुंबई : ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आणि घरभाडे भत्त्याचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. बहुतेक कर्मचारी जवळच्या मोठ्या गावात, शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. त्याचा ग्रामीण भागातील विविध सेवांवर विपरित परिणाम होताना दिसतो. ग्रामीण जनतेला वेळेत दर्जेदार सेवा मिळण्यासाठी आज हा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)कर्मचारी दाखवितात त्यांचा खोटा पत्ताकर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीच्याच गावात राहावे यासाठी यापूर्वी अनेकदा आदेश निघाले पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. बरेचदा कर्मचारी स्थानिक रहिवासाचा पत्ता आपल्या कार्यालयात देतात पण त्या ठिकाणी ते राहत मात्र नाहीत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हा प्रश्न आहे.
मुख्यालयी राहणे बंधनकारक
By admin | Published: September 21, 2016 5:18 AM