लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुण्यात उद्या, शुक्रवारपासून बायो एनर्जी ऊ र्जा उत्सव या दोन दिवस चालणाऱ्या प्रदर्शन व परिषदेची सुरुवात होणार असून, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या परिषद व प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय तेल व नैसर्गिक वायूतर्फे होणाऱ्या परिषदेला देशभरातील शेतकरी, संशोधक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.पारंपरिक इंधनाच्या तुटवड्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जैव इंधनाचा पर्याय पुढे येत असून, केंद्र सरकारही त्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि पुढाकारही घेत आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. बायो क्युएल हे केवळ भविष्यातील इंधन नसून, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी व उद्योजक होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
बायो एनर्जी ऊ र्जा उत्सव आजपासून पुण्यात सुरू
By admin | Published: July 07, 2017 3:59 AM