- अविनाश साबापुरे, यवतमाळराज्य शासनाने आता सर्व अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची पद्धत सुरू करण्याचा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही ही पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यामुळे लेटलतिफ शिक्षकांना आता ‘राइट टाइम’ होण्याशिवाय पर्याय नाही.सध्या शाळांमध्ये हजेरी रजिस्टरमध्ये उपस्थितीची नोंद घेतली जाते. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकविण्यासाठी आणि विशेषत: मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी हजेरी रजिस्टरऐवजी बायोमेट्रिक पद्धती महत्त्वाची ठरणार आहे. सध्या बहुतांश शिक्षक शाळेच्या गावात न राहता ३०-४० किलोमीटरवरून ये-जा करतात. त्यामुळे अनेक शिक्षक शाळेत उशिरा येतात. दुर्गम भागातील गावात तर अनुपस्थित शिक्षकाचीही हजेरी लावण्याचे प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच शिक्षकांची हजेरीही आता बायोमेट्रिक पद्धतीनेच नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सोमवारी हा निर्णय जारी केला असून, २०१६पासून त्याची सर्व शाळांना अंमलबजावणी करावी लागणार आहे.‘नॅक’च्या धर्तीवर शाळांसाठी ‘सॅक’महाविद्यालयांची गुणवत्ता तपासण्यासाठी नॅकद्वारे (नॅशनल असेसमेंट अॅक्रिडिटेशन काउंसिल) मूल्यमापन करण्यात येते. त्याच धर्तीवर आता शाळांचेही मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासन लवकरच ‘सॅक’ची (स्टेट असेसमेंट अॅक्रिडिटेशन काउंसिल) स्थापना करणार आहे.
शाळांमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी
By admin | Published: December 02, 2015 1:37 AM