शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

जगभरातून भारतात येणाऱ्या पक्ष्यांना आवडे महाराष्ट्र! पक्षी राज्यात नेमके कुठे - कुठे थांबतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 9:42 AM

Wild life : मध्य आशियाई उड्डाण मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी महाराष्ट्रात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या पाणथळ जागा आहेत.

मुंबई : मध्य आशियाई उड्डाण मार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी महाराष्ट्रात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या पाणथळ जागा असून, या मार्गाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील सहा पाणथळ प्रदेशांमध्ये ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान करण्यात आलेल्या पक्षी सर्वेक्षणात १८ पाणपक्षी कुटुंबातील एकूण ११२ पाणपक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. पक्ष्यांना आवडे महाराष्ट्र असेच हे चित्र आहे.  

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे ‘मध्य आशियाई उड्डाण मार्ग : महाराष्ट्रातील पक्षी शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशात स्थलांतरित पाणपक्ष्यांची स्थिती स्पष्ट करणे’ हा प्रकल्प राबविला जात आहे. नुकताच त्यांनी पहिला वार्षिक अहवाल (जुलै २०२१-जून २०२२) कांदळवन प्रतिष्ठानला सादर केला. मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने यासाठी बीएनएचएसला २.७७ कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य केले आहे, अशी माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.

पक्षी उड्डाण मार्ग वापरतात; कारण... प्रजनन, विश्रांतीचे ठिकाण आणि हिवाळ्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षी उड्डाण मार्ग वापरतात. कन्व्हेंशन ऑन मायगेट्री स्पेसिसने जगभरात नऊ स्थलांतरित उड्डाण मार्ग दर्शविले आहेत. त्यापैकी एक मध्य आशियाई उड्डाण मार्ग आहे.  ज्यामध्ये ३० राष्ट्रांमधून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे मार्ग समाविष्ट आहेत. त्यातील बहुतांशी मार्ग भारतामधून जातात.

अभ्यास कशासाठी?स्थलांतरित पाणपक्ष्यांचा अधिवास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.उजनी धरण पहिल्या क्रमांकावर एप्रिल २०२२ मध्ये उजनी धरणातून सर्वाधिक ५८ पाणपक्षी प्रजातींची विविधता आणि सर्वाधिक २०,९७७ पाणपक्ष्यांची नोंद झाली.कसे केले सर्वेक्षण  बीएनएचएसने बर्ड मॉनिटरिंग सर्व्हे, बर्ड ट्रॅपिंग, बर्ड रिंगिंग आणि कलर बँडिंग असे विविध प्रकारे सर्वेक्षण केले आहे. सहा पाणथळ जागांवर प्रदूषण शेतीचे वाहून जाणारे पाणी, सांडपाणी आणि प्रदूषित पाणी यामुळे होणारे जलप्रदूषण हे सर्व सहा पाणथळ जागांवर आढळल्याचे हा अभ्यास म्हणतो.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्र