शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

पक्षीगणना: अहमदनगरात ११५ पेक्षा अधिक प्रजातींच्या ६६४४९ पक्ष्याची नोंद

By admin | Published: March 19, 2017 3:05 PM

पक्षीमित्र संघटनांच्यावतीने जिल्ह्यातील चौदा तालुक्यात २४० ठिकाणी केलेल्या पक्षीगणना मोहिमेत ११५ पेक्षा अधीक प्रजातीचे एकूण ६६४४९ पक्षी आढळून आले़

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 19 : विविध पक्षीमित्र संघटनांच्या वतीने जिल्ह्यातील चौदा तालुक्यात २४० ठिकाणी केलेल्या पक्षीगणना मोहिमेत ११५ पेक्षा अधीक प्रजातीचे एकूण ६६४४९ पक्षी आढळून आले. यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांत जिल्ह्यात पाठ फिरविलेल्या रोहित, करकोचा, बदक, हंस, चमचा अशा परदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य आढळून आले आहे तसेच परदेशातून येणाऱ्या भोरडी या पक्ष्यांची यावर्षी सर्वाधिक १९९७७ इतकी नोंद झाली आहे. पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ५० प्रौढ निरीक्षकांसह ७७३ शालेय विद्यार्थ्यांनी ही पक्षीगणना केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाथर्डी तालुक्यातुन या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. या तालुक्यात १७ प्रौढ निरीक्षकांसह २९४ विद्यार्थ्यांनी १०२ ठिकाणी पक्षीगणना केली. गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तलावांत अजूनही पाणीसाठा असल्याने स्थलांतरित व रहिवासी अशा सर्वच प्रकारच्या पक्ष्यांच्या संख्येत यावर्षी वाढ झाल्याचे दिसून आले. पक्षीगणनेत चंद्रकांत उदागे, स्नेहा ढाकणे, डॉ.नरेंद्र पायघन, वाजीद सय्यद, शशी ञिभूवन, ह्रषीकेश गावडे, सुधीर दरेकर, बाळासाहेब डोंगरे, विजय राऊत, अंकुश झिंजे, रावसाहेब कासार, गोकूळ नेहे, ज्योती जाधव, संदीप राठोड, सचिन शिंदे, विकास सातपुते, नम्रता सातपुते, रामेश्वर लोटके, देवेंद्र अंबेटकर, जतीन चव्हाण, ज्योती धाकतोडे, शाहीद शेख आदी पक्षीनिरिक्षक सहभागी झाले होते. सातपुते यांच्यासह शिवकुमार वाघुंबरे,डॉ.अशोक कराळे,अनमोल होन,महेश फलके ,चंद्रकांत उदागे यांनी जिल्हाभर फिरून छायाचिञण केले.नवनी पक्षी आढळले यावर्षी पक्षीगणनेत परदेशी पक्ष्यांबरोबर पिवळा माशीमार, छोटा कंठेरी चिखल्या, तलवार बदक, शिपाई बुलबुल, पांढरा शराटी, मुग्धबलाक, तोई पोपट अशा अनेक नवीन पक्ष्यांची नोंद प्रथमच जिल्ह्याच्या झाली. राज्यात नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या रेडलिस्टमध्ये घोषित केलेल्या कांडेसर (पांढ-या मानेचा करकोचा) या पक्ष्यांची नोंदही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पाणथळ भागात झाली़ पक्ष्यांचे संगोपन व संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांनी व्यक्त केले.