शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वर्ध्यात जन्मताच मिळतो ‘आधार’

By admin | Published: May 24, 2017 2:53 AM

नवजात बालकाच्या आधार नोंदणीसाठी महिन्याची मुदत निर्धारित असताना वर्ध्यात मात्र जन्मानंतर काही तासांतच ही नोंदणी

रूपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवजात बालकाच्या आधार नोंदणीसाठी महिन्याची मुदत निर्धारित असताना वर्ध्यात मात्र जन्मानंतर काही तासांतच ही नोंदणी करण्याची धडाडी प्रशासन दाखवित आहे. अशी सुपरफास्ट नोंदणी करणारे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील बहुदा पहिलेच रुग्णालय असावे!बालक व त्याच्या पालकांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतर आधार नोंदणीसाठी इतरत्र भटकावे लागणार नाही, याची काळजी घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांची आधारनोंदणी सुरू आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. महिलेची प्रसूती झाल्याच्या काही तासांतच तो या बालकाची नोंदणी करीत आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या चिमुकल्याचे आधार कार्ड त्याच्या घरच्या पत्त्यावर टपालाने पोहोचविण्यात येते.