संजीव वेलणकर
पुणे, दि. १९ - सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्तींचा यांचा आज (१९ ऑगस्ट) वाढदिवस.
सुधा मूर्ती यांचे माहेरचे नाव सुधा कुळकर्णी, इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस व इन्फोसिस फाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. त्याचा कुठंही गाजावाजा नसतो, की कर्तृत्वाचा डांगोराही पिटला जात नाही. गरजू व्यक्तीच्या पदरात मदतीचं माप पडावं, एवढीच माफक इच्छा असते. सुवर्ण-पदक मिळवून त्यांनी इंजिनिअरीग ची पदवी मिळविली आहे. एम ई करुन इन्स्टिट्युट ऑफ इन्जिनिअर्सचे सुवर्ण पदक मिळ्विले आहे. पुण्याच्या टेल्को कंपनीत प्रथम महिला अभियंता म्हणुन कामास सुरुवात केली. त्यावेळेस टेल्को मध्ये पुरुष प्रधान संस्कृति विरुद्ध त्यांनी चेअरमनला तक्रार वजा पत्र लिहिले. टाटांनी त्यांना मुलाखतिस बोलावले व लगेच नेमणुक केली. एन आर नारायण मुर्ती यांची ओळख टेल्कोमध्ये झाली.त्यांच्या कानडीत डॉलर सोस नावाच्या कादंबरीवरुन तयार केलेली "डॉलर बहु " नावाची टीव्ही सिरियल २००१ खूप मध्ये गाजली. नारायणमूर्ती यांचे कुटुंब खरोखरच वेगळ्या मातीचे बनलेले आहे. कुठलाही बडेजाव न करणारे आणि साध्या साध्या गोष्टींबाबत कधीही कुरबुर न करणारे. त्यांच्याकडे मनाची आणि संस्कारांची श्रीमंती आहे म्हणूनच त्यांना भौतिक श्रीमंतीचा गर्व नाही. २००६ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
मा. सुधा मूर्ती यांना लोकमत समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.